ग्रामीण पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदीअशपाक शेख तर सचिवपदी सुनिल शिरसाट यांची निवड

0
271

ग्रामीण पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदीअशपाक शेख तर सचिवपदी सुनिल शिरसाट यांची निवड वरोरा(प्रति)ग्रामीण पत्रकार संघ शाखा वरोऱ्या च्या वतीने घेण्यात आलेल्या वार्षिक सभेत वरोरा शाखेच्या कार्येकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये तालुकाध्यक्षपदी अशपाक शेख तर सचिवपदी सुनिल शिरसाट यांची एकमताने निवड करण्यात आली,,,,,, दि,७/३/२०२१रोजी भारत लॉज येथे घेण्यात आलेल्या वार्षिक सभेला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा, राजेशजी सोलापन जिल्हाउपाध्यक्ष मा,विनोद पन्नाशे जिल्हा मार्गदर्शक मा, धर्मेश निकोसे जिल्हा कोषाध्यक्ष मा, प्रकाश हांडे हे उपस्थित होते,सदर मान्यवरांच्या उपस्थितीत संपूर्ण कार्येकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये उपाध्यक्षपदी फैज पटेल सहसचिव मुजाहिद कुरेशी संघटक हितेश राजनहिरे कोषाध्यक्ष विश्वदिप गोंडाने प्रसिद्धिप्रमुख संजय गायकवाड तसेच सदस्य अहेफाज शेख,,, अमर सिंग,,, अजीम शेख यांची निवड करण्यात आली,,, कोरोना काळाच्या माहामारीत संपूर्ण देशावर कोरोनाचे सावट पसरले असतांना या दरम्यान काही पत्रकारांचा नाहक बळी गेला, त्यांना शासकीय स्तरातून कुठल्याही प्रकारची मदत किंबहुना सहकार्य मिळाले नसल्याची खंत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली, असून पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी आपण सातत्याने झटत राहू असे आश्वासन सुद्धा दिले, प्रास्ताविक संजय गायकवाड यांनी केले असता गेल्या 15 वर्षाचा पत्रकार संघाचा आढावा त्यांनी घेतला,,,२००६/०७ला वरोरा येथे ग्रामीण पत्रकार संघाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली, यावेळी जेम्बो कार्येकारिणी तयार करण्यात आली होती,,, यामाध्यमातून विदर्भ स्तरावरील विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात येत होते,,, पत्रकारांसाठी कार्येशाळा, विदर्भ स्तरीय डांस स्पर्धा,,, विविध मेळावे, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ,, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात येत होते,,, परंतु दिवसेंदिवस येनाऱ्याअडचणी निर्माण झाल्याने त्यामुळे कार्येक्रम ठप्प झाले, ही खंत सुद्धा व्यक्त करण्यात आली,परंतु संघाला नवे आणि अनुभवी अध्यक्ष मिळाले असून संघटन मजबूत करून विविध स्तरावर काम करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला,,,,सभेचे उत्कृष्ठ असे प्रास्ताविक व संचालन संजय गायकवाड यांनी केले तर आभार सुधीर गेडाम यांनी व्यक्त केले,,,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here