रेणुका घोडेस्वार यांच्या नेतृत्वात ४१ महिलांचा भाजपात प्रवेश.

0
241
भारतीय जनता पार्टी ,महिला मोर्चा महानगर सचिव रेणुका घोडेस्वार यांच्या नेतृत्वात मध्य(बाजार)मंडळातील ४१ महिलांनी नुकताच भाजपा मध्ये प्रवेश घेतला.
यावेळी भाजपा महिला मोर्चा(श),जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर,महामंत्री शिला चव्हाण,मध्य मंडळ प्रभारी ऍड सुरेश तालेवार,मंडळ महामंत्री संतोष वडपल्लीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या प्रसंगी अंजली घोटेकर,ऍड सुरेश तालेवर व रेणुका घोडेस्वार यांनी महिलांना भाजपाचा दुप्पट्टा प्रदान करून पक्षात प्रवेश दिला.यावेळी ऍड तालेवार म्हणाले,महिलाशक्ती राष्ट्रशक्ती आहे.तिला योग्य संधी मिळाली तर ती संधीचे सोने करते.म्हणून राजकारणातही महिलांचा मोठ्याने सहभाग असावा.घोटेकर म्हणाल्या,भाजपामध्ये महिलांना भरपूर संधी आहे.निसंकोचपणे भाजपात प्रवेश करा व जनहितार्थ काम करा.यावेळी शिला चव्हाण यांनी पण मार्गदर्शन केले.एकाच वेळी ४१ महिलांनी  भाजपात प्रवेश घेतल्याने पक्ष बळकटीकरणासाठी त्याचा लाभ होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी रेखा पडधाने, चंद्रकला डोंगरे ,सारिका डोंगरे, कोमल डोंगरे, आरती डोंगरे, स्वाती डोंगरे ,सावित्री डोंगरे, शारदा पवार, राधिका डोंगरे, अंबिका डोंगरे, ताराबाई डोंगरे, अन्नपूर्णा गायकवाड, दुर्गा सावळे, अनु गायकवाड, पार्वती यादव, माया नवले, सारिका कांबळे, दीपा गायकवाड, नयना पोटफोडे, पल्लवी करूने, गुंफा कळणे, अश्विनी शेळके, कल्पना कळणे, लक्ष्मी मुंगले, गायत्री मुंगले, पिंकी मुंगले नयना जाधव, ज्योती तेलगे, गुणगुण काळे, पुष्पा खंडाळे, सोनू आमटे, निकोवा तेलगे, नेहा कळणे, भारती कळणे, पूजा वानखेडे, विमल डोंगरे, वर्षा डोंगरे, विद्या कळणे, शानू गायकवाड ,मंगला डोंगरे, यशोधरा पाटील, काजल आमटे, प्रमिला पाटील या महिलांनी भाजपात प्रवेश घेतला.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक रेणुका घोडेस्वार यांनी केले.रंजिता येले यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी लता ब्राह्मणे,मोनिषा महातव व लता डोंगरे यांनी परिश्रम घेतले.
भाजपात प्रवेश घेणाऱ्या महिलांचे माजी अर्थमंत्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार,माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर,जिल्हाध्यक्ष डॉ गुलवाडे आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here