गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष पदावर अब्दूल जमीर अब्दुल हमीद यांची निवड*

180

 

राजुरा- चंद्रपूर जिल्हा गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या प्रमुख कार्यकर्त्याची बैठक सिध्देश्वर-देवाडा येथील सांस्कृतिक समाज भवनात पार पडली.या बैठकीत गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा राजुरा पंचायत समितीचे माजी सदस्य अब्दूल जमीर अब्दुल हमीद यांची गोंडवाना गणतंत्र पार्टी अल्पसंख्याक सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष हरीशदादा उईके, वरीष्ठ प्रदेश उपाध्यक्ष सुखलाल मडावी यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
गोंडवाना गणतंत्र पार्टी ही एका समुदायाची नसून गोंडवाना हे नाव भौगोलिक क्षेत्र, राष्ट्र वाचक व देशवाचक आहे. गोंडवाना भुभागात राहणाऱ्या ८५ टक्के मुळनिवासी समुदायाचे प्रतिनिधित्व करणारी राजकीय चळवळ आहे. येथे सर्व समाजांच्या प्रतिनिधी ना सामावून घेऊन वंचित व गोरगरीब जनतेच्या न्याय-हक्का साठी लढा देणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हरीश जी उईके यांनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले.
बैठकीला गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष महेश बमनोटे, किसान पंचायत समिती प्रदेशाध्यक्ष दमडुजी मडावी, प्रदेशसंघटक विठ्ठल उईके, नागपूर जिल्हा अध्यक्ष धनराज मडावी,वर्धा जिल्हा युवा अध्यक्ष सचिन मसराम, गजानन गोदरू पाटिल जुमनाके, जिल्हा बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी, बाजार समिती संचालक निशिकांत सोनकांबळे,ममताजी जाधव,भिमराव पाटील जुमनाके, माजी सभापती भिमराव मेश्राम,प्रदेश प्रवक्ता मेहबूब शेख, नगर सेवक मारोती बेल्लाळे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सैय्यद मुनीर, अनंत बल्लाळे, विधानसभा प्रसिद्ध प्रमुख फारूख शेख, हनमंतू कुमरे,अरूण उदे, संजय सोयाम, सुधाकर कुसराम, नानाजी मडावी, गजानन पाटील पंधरे सह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत गजानन गोदरू पाटिल जुमनाके यांची प्रदेश युवा कार्यध्यक्ष, नामदेव शेडमाके यांची प्रदेश संघटन महामंत्री, महेबुब भाई शेख यांची प्रदेश प्रवक्ता, भास्कर तुमराम यांची प्रदेश संघटक पदावर नियुक्ती करून नियुक्ती पत्र देण्यात आले. तर बापुराव मडावी यांची जिल्हाध्यक्ष पदावर फेर नियुक्ती करण्यात आली.
बैठक यशस्वी करण्यास वसंत पाटील आत्राम, शंकर मडावी, जहीर शेख, प्रभु चेन्नूरवार, भारत मेश्राम, अब्दूल माजीद, गुलाब मेश्राम, सुभाष मडावी व सहकाऱ्यांनी परीश्रम घेतले. अल्पसंख्याक समाज देवाडा कडून प्रदेशाध्यक्ष हरीशदादा उईके व प्रदेश उपाध्यक्ष सुखलाल मडावी यांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.