आदर्श ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्थाचे महिलादिना निमित्य “महिला सुरक्षा अभियान”

199

Chandapur : स्थानिक दत्त मंदिर येथे आदर्श ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था, चांदापुर द्वारा ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधुन महिलाना चांगले आरोग्य लाभावे या सामाजिक उद्देशाने कमीत कमी किमतीत सेनिटरी नेपकिन घरा घरात पोहोचविन्यासाठी” महिला सुरक्षा अभियान” चा शुभारंभ व सेवा देणाऱ्या महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात आदर्श ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था निर्मित उत्पादन वस्तूची प्रदर्शनी लावण्यात आली. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जि.प. उच्च.प्राथ. शाळा चांदापुर मुख्यद्यापिका मा.चल्लावार मॅडम तर अध्यक्ष म्हणून मा. विनोद कोहपरे प्रबंध संचालक महिला सुरक्षा अभियान, प्रमुख पाहुणे मा.वामन किनेकर , मा.पुरुषोत्तम घ्यार ,मा. विनायक कुनघाळकर सर,मा.वैशाली ठाकुर उपाध्यक्ष शा.व्य.समिती,मा.वेणूताई चिंचोलकर सदस्या ग्रा.प,मा.प्रतीक्षा नागापुरे सदस्या ग्रा.प,मा.सुनिता कडूकर सदस्या ग्रा.प.चांदापुर इत्यादी उपस्थित होते . पाहुण्याच्या हस्ते सेवा देनाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. महिलांच्या आत्मशक्ती निर्मिती साठी जिजाऊ चे चरित्र हे पुस्तक , पुष्पगुच्छ देवून चल्लावार मडम, मालाताइ कन्नाके,प्रणाली आत्राम,निशा मुनगेलवार,लक्ष्मी कमनपेल्लीवार,वेणूताई चिंचोलकर,वनिता मर्लेवार,पल्लवी झरकर,रक्षाली पाल इत्यादींचा सत्कार करण्यात आला . सदर जर्यक्रमात महिलांना प्रबोधनात्मक पाहुण्यांचे मार्गदर्शन लाभले
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आश्विनी नागापुरे तर आभार लिना कोहपरे यानी मानले कार्यक्रमाचे आयोजन आदर्श संस्थानी केले कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी रोजगार संघ, गुरुदेव सेवा मंडळ, श्री गणेशा ग्रामसंघ,आदर्श मानवता सार्वजनिक वाचनालय,आदर्श संकल्प बचत गट व महिलांचे बचत गट यानी परिश्रम घेतले कार्यक्रमाला गावातील असंख्य महिलाची उपस्थिती होती