“वस्तीतील अंधार” दूर करण्यासाठी महिलांचे मुख्याधिकारी यांचेकडे साकडे

0
88

गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:

कोरपना तालुक्यात सर्वात मोठे शहर गडचांदूरातील प्रभाग क्रमांक ६ पारखी लेआऊट मध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून लाईटची व्यवस्था नसल्याने याठिकाणी वास्तव्यास असलेल्यांना मोठ्याप्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे.सदर लेआऊटमध्ये अनेक गोर गरीब नागरिकांनी पारखी यांच्या शेतजमिनीची जागा खरेदी करून घरे उभारली.वीज पुरवठा नसल्याने शेजाऱ्यांना विनवणी करून मिळालेल्या वीजेतून आजपर्यंत निभावले मात्र आता अवाच्यासवा वीज बिल येत असल्याने त्यांनी वीज पुरवठा खंडीत केला.परिणामी अंधारात राहण्याची पाळी आली आहे.८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सदर प्रभागातील महिलांनी प्रभागाच्या नगरसेविका सौ.मिनाक्षी एकरे यांना शुभेच्छा दिल्या तसेच वीज पोल(स्ट्रीट लाईट)लावण्यासाठी मागणीचे निवेदन यांच्यामार्फत न.प.मुख्याधिकारी मॅडम यांना पाठवले आहे.यावेळी संगीता गादेकर, सवीता नैताम,रीना संगोळे,सोनू वसाके,पल्लवी ठोंबरे,मीना दाभाडे,कवीता निकोडे यांची उपस्थिती होती.जागतिक महिला दिनी सदर लेआऊटच्या महिलांनी अंधार दूर करण्यासाठी नगरपरिषदेच्या महिला

अधिकारी व महिला नगरसेविकेला घातलेले साकडे चर्चेचा विषय बनला असून याविषयी काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here