महिलाओं के सन्‍मान में भाजपा महिला मोर्चा मैदान में – सौ. अंजली घोटेकर

0
177

हरियाणाच्‍या कॉंग्रेस समर्थीत हुड्डा सरकारचा निषद

8 मार्च जागतिक महिला दिवशी संपूर्ण राष्‍ट्राने आणि परराष्‍ट्रानेही महिलांचा सन्‍मान करीत महिला दिवस साजरा केला. ठिकठिकाणी वेगवेगळया क्षेत्रात काम करणा-या रणरागीणींचा सत्‍कार करण्‍यात आला. त्‍यांच्‍या कामाचा गौरव करून सन्‍मान करण्‍यात आला. कोरोना च्‍या सावटामध्‍ये सुध्‍दा ज्‍या महिलांनी पुढे येवून काम केले त्‍यांचा सुध्‍दा गौरव करण्‍यात आला,  परंतु हरियाणाच्‍या कॉंग्रेस समर्थीत हुड्डा सरकारने महिलांचा अपमान करून या प्रसंगाला काळीमा फासला आहे. स्‍वतः मुख्‍यमंत्री हुड्डा व त्‍यांचे पुरूष मंत्रीगण हे ट्रॅक्‍टरवर बसले आणि ते ट्रॅक्‍टर महिला आमदार आणि पदाधिकारी यांना खेचायला जावले. आमच्‍या मते हा महिलांचा सपशेल अपमान आहे.

या अनुषंगाने पूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्‍या वतीने आज दुपारी ३.०० वा. निषेध आंदोलन करण्‍यात आले. चंद्रपूर महानगर महिला मोर्चाच्‍या वतीने सौ. अंजली घोटेकर जिल्‍हाध्‍यक्षा यांच्‍या नेतृत्‍वात बंगाली कॅम्‍प येथे हुड्डा सरकार आणि कॉंग्रेस सरकार‍ विरूध्‍द निषेध आंदोलन करण्‍यात आले. याप्रसंगी बोलताना सौ. अंजली घोटेकर म्‍हणाल्‍या की, महिलांचा असा अपमान भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा खपवून घेणार नाही. हुड्डा सरकारने त्‍या महिलांची माफी मागून त्‍यांचा सन्‍मान करावा, अन्‍यथा त्‍यांना सरकार चालविण्‍याचा काहीही अधिकार नाही. जे सरकार महिलांना सन्‍मान करीत नाही ते सरकार कोणत्‍या कामाचे. म्‍हणून महिलांच्‍या सन्‍मानाकरिता भारतीय जनता पार्टी मैदानात उतरली आहे. महिलाओं के सन्‍मान में भाजपा मैदान में असा नारा त्‍यांनी दिला.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्‍या सौ. शिलाताई चव्‍हाण, सौ. प्रज्ञा गंधेवार, सौ. प्रभा गुडधे, सौ. किरण बुटले, सौ. लिलावती रविदास, सौ. मंजूषा कासनगोट्टूवार, सौ. रेणुताई घोडेस्‍वार, कु. मोनीषा महातव, सौ. कविता सरकार, सौ. वर्षा बोकडे, सौ. वर्षा सोमलकर, सौ. नूतन मेश्राम, सौ. हर्षा देवूळकर, सौ. पोर्णिमा गुरनुले, सौ. संगीता काळे, सौ. प्रतिभा पाऊणकर, सौ. छाया कलाम, सौ. भारती नवघरे, रंजीता येले, सौ. लता ब्राम्‍हणे आदी महिला उपस्थित होत्‍या. सर्व महिलांनी हुड्डा सरकार व कॉंग्रेस सरकारच्‍या विरोधात जोरदार नारेबाजी करत निषेध नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here