पोस्टमास्तर चा प्रताप ; दुप्पट रकमेचे आमिष दाखवून नागरिकांना घातला कोट्यवधींचा गंडा

241

बोरगाव पोस्टमास्तर चा प्रताप – पोलिसात तक्रार, अन्यायग्रस्तांची पत्रकार परिषदेतून कारवाईची मागणी

चंद्रपूर (प्रतिनिधी):
तालुक्यातील बोरगाव येथील नागरिकाचे पोस्टात बचत खाते होते. यामुळे नागरिक व पोस्ट मास्तरांचे आर्थिक देवाणघेवाणीचे नियमित संबंध जुळले. याचाच लाभ घेत बोरगाव पोस्ट मास्तर यांनी नागरिकांच्या रोख रकमा पाच वर्षात दुप्पट करून देऊ असे आमिष दाखवून एका खाजगी कंपनीत गुंतविले. मात्र मुदत पूर्ण होऊनही रक्कम अदा करण्यात न आल्यामुळे आपली फसगत झाली असे ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी थेट गोंडपिपरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून सदर तक्रारी ची गेल्या दोन महिन्यांपासून कुठलीच चौकशी झाली नसल्याने अखेर पोलीस अधीक्षकांना निवेदन देत , अन्यायग्रस्तांनी दोषींवर कठोर कारवाई तसेच व रकमेची परतफेड करण्याची मागणी पत्रकार परिषदेतून केली आहे.
तालुक्यातील मौजा बोरगाव येथील संजय विलास भसारकर तथा इतर 27 जणांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बोरगाव येथील पोस्टमास्टर प्रकाश तुळशीराम भसारकर हे नागरिकांना पोस्टाच्या विविध योजने बद्दल माहिती देऊन नागरिकांचे बचत खाते व इतर व्यवहार चालवीत होते. असे असताना मास्तर प्रकाश भसारकर यांची मुलगी अश्विनी सुबोध मेश्राम ही राजधानी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या एचबीएन डायरीज अंड अल्लीड लिमिटेड या खाजगी कंपनीची अधिकृत अभिकर्ता होती. प्रकाश भसारकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून नागरिकांना दाम दुप्पट तिचे आम्ही दाखवून आपल्या मुलीच्या नावे अभिकर्ता पद असल्याने एसबीएन डायरीज अँड लिमिटेड या खाजगी कंपनीत रक्कम गुंतवण्यास नागरिकांना प्रवृत्त केले. रक्कम गुंतवताना पाच वर्षाची मुदतीत दाम दुप्पट होईल असे सांगितल्याने मुदत संपताच नागरिकांनी रक्कम वसुलीचा तगादा लावला असता देण्यास टाळाटाळ करीत असल्याने व उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संबंधित पोस्टमास्तर प्रकाश भसारकर व खाजगी कंपनी एजंट अश्विनी मेश्राम यांचे विरुद्ध फसवणुकीची लेखी तक्रार बोरगाव ग्रामस्थांनी 5 जानेवारी 2021 रोजी गोंडपिपरी पोलीस ठाण्यात केली. मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटला असून पोलिसांनी कुठली चौकशी न केल्याने अखेर नागरिकांनी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदनातून न्याय देण्याची मागणी करीत संबंधित दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली आहे. आयोजित पत्रकार परिषदेस शुभांगी संजय भसरकर, हरिदास बंडू डोंगरे, प्रियंका कवडु पसारकर, मंगला भूरकुंडे, कुंदा सुधाकर फुलझेले प्रामुख्याने उपस्थित होते.