नितीनजी भुतडा यांच्या वाढदिवसा निमित्य भाजपा महिला आघाडीची विदर्भस्तरीय ऑनलाईन वक्कृत्व स्पर्धा

0
97

भारतिय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने मा नितीनजी भुतडा यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जागतिक महिला दिनाच्या निमित्यने विदर्भस्तरीय ऑनलाईन वक्कृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा विषय म्हणजे- 21 व्या शतकातील महिला सुरक्षित की असुरक्षीत? या स्पर्धेत  महिलचा भरघोस प्रतीसाद लाभला. सर्व महिलांनी आपआपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजपर्यंत आम्हांला offline मंच मिळाला पण भारतिय जनता पार्टीने ऑनलाइन मंच उपलब्ध करुन देवून प्रगतीचे पाऊल पुढे टाकण्यास प्रोत्साहीत केल.यामधे नागपूरची श्रध्दा शिवनकरने प्रथम पुरस्कार मिळविला यांनी स्त्री मानसिक सामजिक,राजकिय, आर्थिक, असुरक्षीत असे ठाम मत माडले तर व्दितीय पुरस्कार मिळविला तो यवतमाळच्या सोनाली राम पंचभाई याना,  स्त्री पुरुषाच्या बरोबरीत कशी सुरक्षित आहे ही भुमिका घेतली.तुलना केल्यास भरलेला पेला अधिक दिसतो असे त्या म्हणाल्या. पुणे येथील सिमरण थूल याना तृतीय पुरस्कार मिळाला त्यानीस्त्री असुरक्षीत आहे हे सांगून अनूभव कथन केले. प्रोत्साहन पर पुरस्कार यवतमाळच्या किर्ती मुक्कावार याना मिळाला. यानी स्त्रि असुरक्षीतेबाब्त चिंता व्यक्त केली. मुलिमधे फक्त यवतमाळच्या प्राप्ति यादव ला प्रोत्साहन पर पुरस्कार मिळाला. स्पर्धेचे परीक्षक मा. ललिताताई घोडे साहित्यिका आदर्श शिक्षिका पुरस्कृत आणि मा किर्तीताई पदमावार समाजसेवीका, संस्कारकलश प्रनेत्या, राजभऊ पडगिलवार जिल्हा महामंत्री, महिला अध्यक्षा मायाताई शेरे अध्यक्षा महिला आघाडी, सुनिल भाऊ समदुरकर अध्यक्ष ओबिसी मोर्चा,आयोजक शैलाताई मिर्झापूरे जिल्हा सचिव भाजपा ,आणि उषाताई खटे शहराध्यक्ष यानी विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख उपस्थिती मा. ललितताई घोडे आदर्श शिक्षिका पुरस्कृत,मा, राजूभाऊ पडगिलवार जिल्हा महामंत्रि, मा.मायाताई शेरे अध्यक्षा महिला आघाडी मा सुनीलभाऊ समदुरकर,अध्यक्ष ओबीसी मोर्चा, मा शंतनुभाऊ शेटे आध्यात्मिक आघाडी, मा ज्ञानेश्वर सुरजूसे आध्यात्मिक आघाडी.मा रुपाताई यादव शहर सचिव भाजपा मा रमेष फुलकर यांची लाभली..प्रास्ताविक उषाताई खटे शहराध्यक्ष यानी तर संचलन व आभारप्रदर्शन शैलाताई मिर्झापूरे जिल्हा सचिव भाजपा यानी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here