आदर्श ग्राम निर्माण कार्यात रोजगार संघाची भूमिका महत्त्वाची :- विनोद पन्नासे

0
179

 

लोकसहभागातून ग्राम निर्माण करायचे असेल तर त्यासाठी रोजगार संघ महत्वाची भूमिका महत्वाचीअसे मत रोजगार संघाचे केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष तसेच चंद्रपूर वार्ताचे संपादक श्री विनोद पन्नासे यांनी व्यक्त केले. ते चंद्रपूर जिल्ह्यातील बोर्डा आणि नकोडा ग्राम पंचायत मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्राम विकास कार्यक्रमात बोलत होते.विनोद पन्नासे यांनी आज रोजगार संघाचे सरचिटणीस उध्दव साबळे यांचे सोबत उक्त गावात भेट देऊन गावाची पाहणी केली .गावकरी मंडळींना समूहिक शक्तीचे महत्व सांगून रोजगार संघाने आदर्श केलेल्या नागपूर जवळील ब्राम्हणी गावाची यशोगाथा विषद केली

. लोकसहभागातून ग्राम विकास हवा असल्यास रोजगार संघ करीत असलेले कार्य बघा.आज अनेक गावांत रोजगार संघ पर्यावरण विकास,जलसंवर्धन ,सेंद्रिय शेती या विषयावर प्रामुख्याने लक्ष वेधून कार्य करीत आहेत. आपण देखील रोजगार संघाचे कार्य समजावून घ्या व गावाला आदर्श करा,किती दिवस आपण पाटोदा,हिवरेबाजार,राळेगण सिंधी या गावाचे गोडवे गात राहणार आहोत ?असा प्रश्न उपस्थित करून ग्राम निर्माण कार्या बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी गावकरी मंडळी सोबतच बोर्डा व नकोडा चे सरपंच,ग्रामसेवक रोजगार संघाचे सरचिटणीस उध्दव साबळे यांची उपस्थिती होती.आदर्श ग्राम निर्माण कार्यात रोजगार संघाची भूमिका यावर विनोद पन्नासे यांनी विशेष प्रकाश टाकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here