महिलांच्या न्याय व हक्का साठी “नारी शक्ती” महिला संघटनेची स्थापना

240

नारी शक्ती महिला संघटनेच्या अध्यक्ष पदी सुनीता गायकवाड यांची एकमताने
निवड करण्यात आली

चंद्रपूर – जिल्ह्यात वाढणारे महिला अत्याचारावर आजपर्यंत अनेकांनी आवाज उचलला मात्र काही काळानंतर हा आवाज सुद्धा दबल्या गेला आहे.
जिल्ह्यात घटणाऱ्या महिला अत्याचारावर स्थानिक संघटना आवाज उचलताना दिसत नाही, मात्र दुसऱ्या जिल्ह्यात जेव्हा कुण्या महिला व मुलीवर अत्याचार होतो त्यावेळी जिल्ह्यातील महिला संघटना जागे होतात परंतु स्थानिक घटनांना बगल देण्याचं काम करीत असतात.
नुकत्याच शहरातील प्रतिष्ठित खाजगी ट्रॅव्हल्स वाहकाने युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली मात्र जिल्ह्यातील एकाही महिला संघटना त्या घटनेवर बोलल्या नाही फक्त महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना सोडून.
जिल्ह्यातील अत्याचारग्रस्त, पीडित व निराधार महिलांना आधार मिळावा यासाठी “नारी शक्ती” संघटना पुढे आली आहे.
न्यायासाठी भटकणाऱ्या महिलांना आता नारी शक्ती आधार देणार अशी शपथ महिलांनी घेतली असून संघटनेची कार्यकारणी सुद्धा गठीत करण्यात आली आहे.
बैठकीत सर्वानुमते घेतलेल्या निर्णयात नारी शक्ती महिला संघटनेची अध्यक्ष सुनीता गायकवाड यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष सायली येरने, सचिव ऍड. विना बोरकर, सदस्य म्हणून पूजा शेरकी, अलका मेश्राम, माधुरी निवलकर, प्रतिभा लोनगाडगे, अर्चना आमटे, प्रमिला बावणे, संगीता ठेंगणे, संतोषी चव्हाण, माला पेंदाम, शमा काजी, अनिता झाडे, वर्षा भोमले व रूपा परसराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.