वाढदिवस पडला महागात : शाळकरी मुलीचा नदीत बुडून मृत्यू

0
283

• वर्धानदीपात्रात शोध मोहीम सुरूच

चंद्रपूर (प्रतिनिधी): 16 मार्च 2021
बल्लारपू शहरालगत वाहणाऱ्या वर्धा नदीच्या गणपती घाटावर वाढदिवस साजरा करण्यासाठी शाळकरी मुलींपैकी एका 12 वर्षीय शाळकरी मुलीचा नदीत पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची खळबळजणक घटना आज मंगळवारी सायंकाळच्या उघडकीस आली आहे. अक्षरा बबन सोनटक्के रा. साईबाबा वॉर्ड बल्लारपूर असे मृत शाळकरी मुलीचे नाव आहे. वृत्त लिहिपर्यंत नदीतून मृतदेह मिळालेला नव्हता.
बल्लारपूर शहरापासून लागून वर्धा नदी वाहते. याच नदीकाठावर गणपती विसर्जन घाट म्हणून पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी स्थानिक पर्यटक येतात. छोटेमोठे कार्यक्रमातून पर्यटनाचा लूटतात. आज मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वाढदिवस साजरा करण्यासाठी बल्लारपूर येथील तिन शाळकरी मुली संजना गजानन धुर्वे (21) वर्ष रा साईबाबा वॉर्ड, रविना आत्राम (20) श्रीराम वॉर्ड, अक्षरा बबन सोनटक्के (12) गेल्या होत्या. या ठिकाणी संजना धुर्वे हिचा वाढदिवस साजरा केल्यानंतर एकमेकींना केक भरविला. त्यानंतर त्या पर्यटन स्थळावरील नदीत हात धुण्यासाठी उतरल्या. त्यापैकी अक्षरा ही खोलगट भागात गेल्याने तिचा पाय घसरला आणि ती बुडाली. बल्लारपूर साईबाबा वॉर्डातील निवासी अक्षरा बालाजी हायस्कुल बामणी येथे 7 व्या वर्गात शिकणारी हुशार व होतकरू मुलगी होती. ती नदीत बुडाली माहिती बल्लारपूरात पोहचता नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बल्लापूर पोलिसांनी माहिती देण्यात आली. सदर घटनेची माहिती या दोन्ही मुलींनी त्वरित पोलीस स्टेशनला दिली. पोलीसांनी घटनास्थळी येवून शोधमोहीम सुरू केली आहे. वृत्तलिहीपर्यंत अक्षराचा मृतदेह मिळालेला नव्हता.
000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here