गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी…..

0
242

चंद्रपुर  भाजपाने केले निषेध आंदोलन.

येथील भारतीय जनता पार्टी,चंद्रपुर जिल्हा तर्फे माजी वित्तमंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात जटपूरा गेट परिसरात  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा किंवा त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी,या मागणीला घेऊन जोरदार निदर्शने करण्यात आली.
भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे व जिल्हाध्यक्ष (ग्रा)देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात झालेल्या “राज्य शासनाचा निषेध आंदोलनात सहभागी भाजपा पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या  विरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला.
यावेळी महानगर भाजपा महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार,ब्रिजभूषण पाझारे, रवी गुरनुले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष(ग्रा)अल्का आत्राम,महानगर जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर,महामंत्री शिला चव्हाण,भाजयुमो जिल्हाध्यक्ष (ग्रा)आशिष देवतळे,जिल्हाध्यक्ष महानगर विशाल निंबाळकर,महामंत्री प्रज्वलंत कडू,प्रमोद क्षीरसागर,मंडळ अध्यक्ष विठ्ठलराव डुकरे,संदीप आगलावे,सचिन कोतपल्लीवार,रवी लोणकर,मंजुश्री कासंगोट्टूवार,गजानन गोरंटीवार, उषा मेश्राम,ऋषी कोटरंगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी डॉ गुलवाडे म्हणाले,राज्यातील ठाकरे प्रणित सरकार सगळयाच बाबतीत अपयशी ठरले आहे.१६ महिन्यात ४ मंत्री गंभीर आरोपाच्या पिंजऱ्यात अडकले.पण मुख्यमंत्री गप्प आहेत. ना अनिल देशमुख प्रकरणी, मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्रांना मेल पाठवूनच नाही, तर प्रत्यक्ष भेटून, १००कोटी रु वाझे यांना वसुली करण्यासाठी ना.अनिल देशमुखांनी सूचित केल्याची माहिती दिली.असे वृत्त प्रकाशित झाले आहे. पूर्ण महाविकास आघाडीचा या प्रकरणात अर्थपूर्ण सहभाग नाकारता येत नाही.असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी ना.अनिल देशमुख यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रा) देवराव भोंगळे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
यावेळी प्रभा गुढधे,सपना नामपल्लीवार,ती रविदास,रेणू घोडेस्वार,मोनिषा महातव, पूनम गरडवा,माया उईके,शीतल आत्राम,सुषमा नागोसे,किरण बुटले,सौ बात्ते,सौ भडके यांनी घोषणाबाजी करीत शासनाचा निषेध नोंदविला
यशस्वीतेसाठी महेंद्र जुमडे,प्रमोद शास्त्रकार, अमोल उत्तरवार, रितेश वर्मा, रामजी हरणे, राम नारायण रविदास, चांद पाशा सय्यद, रामकुमार अकापेलिवार,यश  बांगडे,हिमांशू गादेवार,गणेश रामगुंडवार, अमित गौरकर,राजू भोयर,सुनील डोंगरे, आदित्य डवरे,रजिया कुरेशी ,राहुल बिसेन,  प्रतीक बारसागडे, धनराज कोवे, आकाश ठूसे, मनोज उगेमुगे, देवेंद्र बेले,  दिनेश परतेती,स्नेहल लांजेवार, संजय पटले,मनीष पिपरे अक्षय शेंडे, सुरज सरदम,विनोद मीटघरे, शशिकांत मस्के, प्रवीण उरकुडे,शुभम नामदेव डाहुले, विवेक बोढे, विजय आगरे, पारस पिंपळकर, विनोद खेवले अमोल खैरे,बबलू सातपुते, सोमनाथ वटाणे, धनराज पारखी, सुरेंद्र भोंगळे, सुभाष पिंपळशेंडे यांनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here