महिला राज :- महिलांकडून पुरुषावर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात पोलीस अधिक्षकांची भेट*

490
चंद्रपूर:-भारतात पुरुष प्रधान संस्कृती आहे असे म्हणतात, परंतु आता स्त्री प्रधान संस्कृतीची सुरवात झालेली आहे याचे कारण आज 70%घरात महिलराज आहे,त्यामुळे महिलांकडून पुरुषावर होणाऱ्या अत्याचाराच्या तक्रारीत  लक्षणीय वाढ झालेली आहे,मात्र पुरुष कुटुंबाच्या प्रेमापोटी तक्रार करीत नाही.परंतु महिला हुंडाबळी 498(अ),गृहहिंसाचार,बलात्कार,घटस्फोट,मुलांचा ताबा,निर्वाह भत्ता,कार्यालयीन छळ अशा खोट्या बनावट तक्रारी करण्याचे प्रमाण दिवसे दिवस वाढत आहे,या संदर्भात मा.पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याशी विस्तृत व सकारत्मक चर्चा झाली शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष डॉ नंदकिशोर मैंदळकर,सुदर्शन नैताम,वसंत भलमे, इंजि दीपक पराते,सचिन बरबतकर,डॉ गुरुदेव गेडाम,मोहबत खान विनोद पिसे,नितीन चांदेकर,गंगाधर गुरनुले,राजू कांबळे,गौरव आक्केवार आदी उपस्तीत होते.
महिला राक्षणाकरिता कायदे तयार करण्यात आले परंतु त्याच कायद्याने पती व सासर संपविण्यात येत आहे.कुंपणच शेत खत आहे,कायद्याचा धाक दाखवून लुटणे,त्याची समाजात बदनामी करणे,आर्थिक गळचेपी करणे,पतीचा (ATM) सारखा वापर करणे,सासरला ब्लॅकमेल करून पैसे उकळणे,घटस्फोट देण्यासाठी अवास्तव पैश्याची मागणी करणे,सासू सासऱ्याला त्रास देऊन वृद्धाश्रमात जाण्यास मजबूर करणे,जणूकाही महिलांना कायद्याने लायसन्स मिळाले आहे,पोलीस विभागाने तक्रार कर्तीची नार्को टेस्ट करायला हवी आणि दोषी आढळल्यास तिच्यावर कडक कार्यवाही करायला हवी,पती व सासरला गजाआड करण्याची खुमखुमी वाढली आहे,
पुरुषसाठी देशामध्ये एकमेव असलेली हेल्पलाईन 8882-498-498 जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना भारतीय परिवार बचाव संघटना व जिईओ ची दिनदर्शिका भेट देण्यात आली,महिला खोट्या बातम्या पसरवून वार्डात,समाजात,गावात पुरुष्याची बदनामी करतात तेव्हा पुरुषयानेही आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचल्याशिवाय न्याय मिळणार नाही,आता घाबरू नका,लाजू नाका संपूर्ण देशात पुरुष्यासाठी हेल्पलाईन उपलब्ध झालेली आहे,आपली तक्रार नोंदवा,पोलिसात तक्रार देण्यास लाजू नका आपल्या बेसावध पणामुळे आपल्या आई वडिलांना व घरातील मंडळींना नाहक त्रास सहन करावा लागतो जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे त्यातूनच कौटुंबिक सामंजस्य घडून येतो,तक्रारीमध्ये पुरुष मंडळींची टक्केवारी फारच कमी आहे आपली तक्रार महिला सहाय्यक कक्ष,पुरुष हेल्पलाईन ला कळवा त्यात योग्य समुपदेशन होऊन मार्गदर्शन होईल,कुटुंब विभक्त होईल असे कोणतेही पावले उचलू नका, महिला व पुरुषांना समान कायदा असावा या करिता भारतीय परिवार बचाव  संघटन,Gender Equality organisation(GEO)च्या वतीने महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुषांना आपले हक्क मांडण्याकरिता पुरुष आयोग स्थापन करण्यात यावा.ही संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.