सत्कार कर्तृत्वाचा :- उल्लेखनीय कामगिरी करणा-या युवतींचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सत्कार

158
  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत यंग चांदा ब्रिगेडच्या युवती विभागाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या युवतींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सदर युवतींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन  गौरविण्यात आले. यावेळी, कल्याणी जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, नगर सेविका सुनिता लोढीया आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखणीय काम केल्या जात आहे. महिलांसाठी विविध आयोजन करुन त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुरु आहे. दरम्याण जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने यंग चांदा ब्रिगेेडच्या जैन भवण जवळील कार्यालयात विविध क्षेत्रात यशस्वी काम करणा-या युवतींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वकील प्रेरणा भास्कर साहारे, पोलिस विभागाच्या प्रदन्या गावडे, पत्रकार वर्षा कोल्हे, क्रिडा क्षेत्रातील संगीता बामबोडे, डाॅ. दिशा चांदेकर, माॅडल पुजा पाॅल, उत्तम विद्यार्थी मयुरी आश्राम, एमबीए गोल्ड मेडलिस्ट रुचिता गर्गेलवार, एमएसईबीच्या दक्षता अधिकारी सुप्रिया भगत, ग्राम पंचायत सदस्या प्रतिक्षा देऊळकर, एमएसईबी विभागाच्या तृप्ती हलदार, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मेश्राम, कराटे पट्टू ज्योती जयपूरकर, कवियत्री दिव्या हातगावकर, शिल्पा कोंडावार, कोरोना योध्दा सपना बावणे,  इंजी प्राजक्ता उपरकर यांच्यासह एस टी महामंडळात कार्यरत 13  युवतींचा   युवतींचा आमदार किशोर जोरगेवार व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. चंद्रपूरातील युवतींनी सर्वच क्षेत्रात आपला यशस्वी ठसा उमटवीला आहे. त्यांची ही कामगीरी चंद्रपूरसाठी गौरवशाली असून त्यांचा हा प्रवास ईतरासांठीही प्रेरणादाई असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या आशा देशमूख, दूर्गा वैरागडे, विमल काटकर, नंदा पंधरे, सोनाली आंबेकर, कल्पना शिंदे, वैशाली मद्दीवार, वैशाली रामटेके, सविता दंडारे, कौसर खान, डाॅली देशमूख, प्राची नंदलवार, वैष्णवी निनजे, गायत्री येलाडे, वैशाली पिदूरकर, जास्मीन शेख आदिंची उपस्थिती होती. यावेळी भाग्येश्री हांडे यांनी प्रास्तावना केली तर सुरेखा काटंगे यांनी आभार प्रदर्शन केले.