कोळसा खाणीच्या खड्डयात बुडून युवकाचा मृत्यू

0
271

Chandrapur (प्रतिनिधी):

गुरे पाणी पाजायला गेलेल्या युवकाचा कोळसा खाणीच्या खड्डयात बुडून करुण अंत झाल्याची घटना भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत बेलोरा (किलोनी) या गावात घडली.

भद्रावती तालुक्यातील बेलोरा (किलोनी) येथील रहिवासी असलेला पराग बंडू गाडगे (२२) हा दिनांक १९ मार्च पासून घरून बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिसांत करण्यात आली होती.हा तरुण भद्रावती मध्ये औधोगिक प्रशिक्षण घेत होता. दरम्यान १९ तारखेला आपले प्रशिक्षण आटोपून सरळ शेतात गेला.
त्यावेळी तो डागा माईन्स कंपनीने उत्खनन केलेल्या खड्डया मध्ये सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान स्वतःची गुरे पाणी पाजताना गेला होता. दरम्यान त्याचा खड्यात तोल जाऊन पाण्यात पडल्यामुळे तो बुडाला.दरम्यान मुलगा घरी न परतल्यावर घरच्यांनी जवळपास दोन तीन दिवस शोध घेतला असता तो आढळून आला नाही. दरम्यान आज सोमवारी काही नागरिक खाणींतील खड्डयावर पहायला गेले असता मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आले. याची माहिती भद्रावती स्टेशन ला तात्काळ देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करुन नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here