लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

0
263

Nagpur

लग्नाचे आमिष दाखवून युवकाने तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या तरुणीशी साक्षगंध केले. यामुळे पीडित तरुणीने नवीन कामठी पोलिस स्टेशन गाठून युवकाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून युवकाचा शोध सुरू केला आहे. धर्मदास उत्तमराव गेडाम (रा. चिमूर, जि. चंद्रपूर), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

पीडित तरुणी कामठी येथे राहाते. ती उच्चशिक्षण घेत आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये धर्मदास हा विद्यापीठात एमए करीत होता. यादरम्यान विद्यापीठ ग्रंथालयात त्याची पीडित तरुणीसोबत ओळख झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शेगावसह विविध ठिकाणी अत्याचार केला.

दरम्यान, धर्मदास याने अन्य तरुणीसोबत साक्षगंध केले. याबाबत पीडित तरुणीने त्याला जाब विचारला असता धर्मदास याने लग्नास नकार देत, तरुणीला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित तरुणीने नवीन कामठी पोलिसांत तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक आर.एस. नरोटे यांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून धर्मदास याचा शोध सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here