ताडोबात आढळला बिबट्याचा मृतदेह  कारच्या अपघात मृत्यू झाल्याचा संशय

0
196

ताडोबात बिबट्याचा मृतदेह आढळला
 कारच्या अपघात मृत्यू झाल्याचा संशय

चंद्रपूर (प्रतिनिधी): 25 मार्च
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली-पद्मापूर मार्गालगत एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे. रविवारी याच मार्गावर कारचा अपघात झाला होता. कारने झाडाला धकड दिली होती. त्या अपघातस्थळाच्या जवळच बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने वाहन अपघात त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय वर्तविला जात आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पद्मापूर प्रवेशद्वारजवळून 500 मीटरच्या अंतरावर 21 मार्च रोजी साडेनऊच्या सुमारास एम एच 34, बि.आर. 6979 या कारने झाडाला जोरदार धडक दिली होती. त्यात दोन पर्यटक जखमी झाले होते. त्यांनतर जखमींना दुसऱ्या वाहनांमध्ये नेऊन रूग्णालयात भरती करण्यात आले होते. अपघातग्रस्त वाहन हे बल्लारपूर येथील रजत परमार यांचे होती. दरम्यान अपघात गस्त वाहनाच्या स्थितीवरून अपघातची भिषण होता हे लक्षात येते. तिन दिवसानंतर अपघातग्रस्त स्थळाजवळ बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे. बिबट कुजल्यामुळे दुर्गंधी सुटली. त्यात ठिकाणी पहाणी करण्यात आल्यानंतर बिबट्चा मृतदेह आढळून आला. सदर अपघात हा बिबट्याचा वाचविण्याच्या प्रसंगात झाला असावा अशी शंका निर्माण झाली आहे. अपघातग्रस्त वाहनाची ज्याला जोरदार धडक लागली असावी ज्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची शंका वर्तविली जात आहे. सदर बिबट्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येवून मृतदेह ताब्यात घेतले. बिबट्याचे शविच्छेदन करण्यात आले आहे. यावेळी सहायक वन संरक्षक येडे, वन परीक्षेत्रअधिकारी मुन, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे, डॉ. खोब्रागडे, डॉ. पोदाचलवार यांची यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here