तीन वर्षाच्या बलिकेवर नराधमाचा अत्याचार

0
170

चंद्रपूर – 25 मार्चला सावरकर नगर शासकीय दूध डेअरी जवळील 35 वर्षीय इसमाने 3 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी घरी टीव्ही बघत होती, शेजारी राहणारी महिला घरी आल्याने पीडितेच्या आईने दरवाजा उघडला त्यावेळी पीडित मुलगी ही खेळण्यासाठी बाहेर गेली असता आरोपीने संधी साधत मुलीला घरी नेले, व तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.
पीडितेच्या आईने आरोपी 35 वर्षीय भीमराव गोंगले ला जाब विचारला असता त्याने उलट पीडितेच्या आईलाचं धमकी दिली.
पीडितेचे वडील घरी आल्यावर त्यांनी तात्काळ मुलीला सोबत घेत रामनगर पोलीस स्टेशन गाठले.
यावेळी पीडित मुलीच्या आईने नारी शक्ती महिला संघटनेला सोबत घेत भीमराव विरोधात तक्रार दिली, रामनगर पोलिसांनी आरोपी भीमराव गोंगले विरोधात बलात्कार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली.
आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास राधिका पवार करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here