राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट चैम्पियनशिप स्पर्धेत राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूरच्या खेळाडूंचे उत्तम प्रदर्शन

0
230

 

बल्लारपूर :- हिमांशू पन्नासे

*कन्याकुमारी ( तामिळनाडु ) येथे होणाऱ्या ३१ वी सीनियर राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट चैम्पियनशिप स्पर्धेकरिता विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट संघात राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर चंद्रपूर येथील खेळाडूंची निवड*

* : कन्याकुमारी येथे होणाऱ्या ३१वी सीनियर राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट चैम्पियनशिप स्पर्धेत सहभाग होण्याकरिता विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, नागपूर ( वी.टि.बी.सी.ए. ) पुरुषांचा व महिलांचा विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट संघ जाहीर केला आहे . सदर स्पर्धा ही दिनांक २० ते २३ मार्च २०२१ रोजी कन्याकुमारी ( तामिळनाडु ) येथे आयोजन करण्यात आलेली होती . सदर विदर्भाच्या पुरुष संघात राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर तह . बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथील इंद्रजित निषाद , कालिदास भोयर , सुरज परसुटकर , चंद्रकांत परसुटकर तसेच महिलांच्या संघात रुचिता आंबेकर , पायल वरारकर , नेहा बसेशंकर , भाग्यश्री मेश्राम , अंजली चलकलवार , निकीता ढोरके इत्यादी खेळाडूंची निवड झालेली आहे . सदर स्पर्धेत महाविद्यालयातील सर्व खेळाडूंनी खेळाचे उत्तम प्रदर्शन करुन आपल्या महाविद्यालयाचे नाव लौकीक केले . सर्व खेळाडुंनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई – वडिल व त्यांचे मार्गदर्शक व प्रशिक्षक प्रा . विक्की तुळशीराम पेटकर यांना दिले .
सदर स्पर्धेच्या यशाबद्दल राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर चे प्राचार्य डॉ . दिलीप टि . जयस्वाल शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा . विक्की पेटकर , शालीनी आंबटकर , प्रा . पुर्वा खेरकर आदी प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here