राज्यात’विकेंड’ लॉकडाऊन! इतर दिवशी कडक निर्बंध!

0
242

‘विकेंड’ लॉकडाऊन! इतर दिवशी कडक निर्बंध!

रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी, शुक्रवार सायंकाळी ८ ते सोमवार सकाळी 7 पर्यंत संपूर्ण lokdaun

 

मुंबई: राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यात पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, लॉकडाऊन नसला तरी विकेंड लॉकडाऊन, नाइट कपर्दू आणि इतर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सोमवार ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ‘ब्रेक दि चेन’ असे संबोधण्यात येणार

याबाबत अधिक माहिती देताना राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले, की राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, उद्यापासून रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, तसेच राज्यात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कठोर लॉकडाऊन लागू असणार आहे.

खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा

रस्त्याच्या कडेला असणार्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल.

सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन

५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत नियम लागू!

काय सुरू काय बंदः

लोकल ट्रेन

सुरू राहणार.

जिम बंद होणार,

हॉटेलमधून पार्सल सेवा सुरू असेल.

अत्यावश्यक सेवा सुरू राहणार, उद्याने

पूर्णतः बंद.

रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील,

सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार.

धार्मिक स्थळांवर निर्बंध, सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णतः बंद, गार्डन, मैदाने बंद.

जिथे कोरोना केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला,

सिनेमा, मालिकांचे शूटिंग मोठ्या संख्येने करता येणार नाही. रिक्षा- ड्रायव्हर + २ लोक.

बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल,

टेस्टिंग कडक करणार.

वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु

वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी

लसीकरण करून घ्यावे.

शेतीविषयक कामे सुरु

शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.

रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी

राज्यात १४४ कलम लागू केले जाईल. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहीलतसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.

कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना, मंत्रालय, महत्त्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदी.

चित्रपट शूटिंगला परवानगी आहे. पण गर्दी करू नये लढाई.आंदोलन असे सीन असतील त्या शूटिंगला बंदी. • बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येने सोडले जाईल. शाळा, कॉलेजेस बंद, इंडस्ट्री चालू राहतील. २० लोकांना अंत्यविधींसाठी परवानगी. लग्नसमारंभांबाबत लोकांची संख्या मर्यादित.

विमानप्रवासाबाबत कोणतेही बदल नाहीत. मात्र,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here