सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे कोविड योद्धांचा सत्कार

0
109

 

बल्लारपुर- अक्षय भोयर(ता,प्र)

आज दिनांक 09.04.21 ला सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे अशा कोविड योद्धांचा सत्कार करण्यात आला जे सर्व देशभर असलेला कोरोना विषाणूने (कोविड -19)संपूर्ण जग व्यापून टाकले आहे अशा बिकट परिस्थितीत जे कोरोना योद्धा समाजाप्रति करीत असलेले आपले कार्य निरंतर करीत आहे,आपली सेवा देत आहे.आपण करत असलेल्या अशा कार्यामुळे आपली असलेली समाजाप्रती आपली बांधिलकी दिसून येत आहे. आपण हेच कार्य करीत असलेल्या धैर्याला, व अतुलनीय समाज कार्याला सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब कडून मानाचा सलाम तसेंच या योद्धांचा सत्कार हा मा. आमदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार लोकलेखा समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य , माजी वनमंत्री तथा अर्थ मंत्री यांच्या हस्ते तसेच बल्लारपूर चे नगराध्यक्ष हरीश शर्मा जी, पत्रकार श्रीनिवास कदकरी जी यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमात सुधीर भाऊ फॅन्स क्लब चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर जी, नगरसेवक स्वामी रायबरम जी, अल्प संख्यांक आघाडी अध्यक्ष सलीम नबी अहमद जी,शहर सचिव सतीश कणकम जी,प्रकाश देतपल्ली जी, सुधाकर सिक्का जी,आबीद भाई जी,हरीबाबू लंका जी,रोहिन तोकलं जी,कमल वर्मा जी, राजेश पाल जी ,वाजपेयी जी, शुभम बहुरिया जी,पारधी जी, अनिकेत, प्रेरित, शुभम सर आदींचा समावेश साक्षीने सत्कार कार्य पार पाडण्यात आला….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here