डेरा आंदोलनावर लवकरच निघणार तोडगा

0
111

 

डेरा आंदोलनावर तोडगा काढण्याच्या हालचालींना वेग
पालक मंत्री विजय वडेट्टीवार व जनविकासचे पप्पू देशमुख यांच्यात महत्वपूर्ण बैठक

डेरा आंदोलनाला आज २ महिने पूर्ण झालेले आहेत.कोविड योध्द्या कामगारांना ७ महिन्यांचा थकीत पगार देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन व राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला पूर्णत अपयश आल्याने आंदोलन सुरू आहे.करोनाची परिस्थिती गंभीर होत असल्याचे मागील तीन दिवसांपासून स्वतः पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी जातीने लक्ष घालणे सुरू केले.दोन दिवसापूर्वी पालकमंत्र्यांच्या एका वक्तव्यामुळे आंदोलनकर्ते संतापले होते. मात्र दोन्ही बाजूने पुन्हा एकदा चर्चेची नव्याने सुरुवात करण्यात आली.पालकमंत्री वडेट्टीवार यांनी काल दिनांक ८ एप्रिल रोजी जनविकास कामगार संघाच्या मागणी नुसार थकीत पगार थेट कामगारांच्या खात्यात जमा करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे सोबत पुन्हा एक बैठक लावली होती.यानंतर जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना पालकमंत्र्यांनी नागपूर येथील निवासस्थानी चर्चेसाठी बोलावून घेतले.आज ९ एप्रिल रोजी सकाळी ११ च्या दरम्यान पालकमंत्री विजय वडेट्टीवार व पप्पू देशमुख यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक झाली.यावेळी जनविकास सेनेचे इमदाद शेख तसेच अमोल घोडमारे सुद्धा उपस्थित होते. कामगारांच्या खात्यामध्ये थकीत पगार टाकणे तसेच त्यांना किमान वेतन लागू करणे याबाबत बैठकीमध्ये महत्वपूर्ण चर्चा झाल्याचे एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे देशमुख यांनी कळविले आहे.त्यामुळे लवकरच डेरा आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची शिक्षा कामगारांना, प्रत्येक कामगाराचे महिन्याला ५००० रूपये नुकसान

दोन वर्षांपूर्वी केलेल्या संघर्षामुळे किमान वेतन मंजूर झाले होते.परंतु आजपर्यंत त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही.
विशिष्ट कंत्राटदाराला लाभ पोहचविण्यासाठी पद व अधिकाराचा दुरुपयोग करणारे चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे जुने अधिष्ठाता डॉ एस.एस.मोरे, नवे अधिष्ठाता डॉ.अरूण हुमणे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डाॅ. तात्यासाहेब लहाने व सचिव सौरभ विजय या सर्व अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट व भोंगळ कारभाराचा शेकडो कोविड योध्द्या कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला, दोन कामगारांचे जीवही गेले. कामगारांना त्यांच्या हक्काच्या पगारापेक्षा दरमहा ५००० रुपये कमी वेतन मिळत आहे.आंदोलनामध्ये कामगारांवर एक वेळा लाठीचार्ज झाला,दोन वेळा गुन्हे दाखल झाले. परंतु आजही सर्व कामगार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.किमान वेतनाच्या नवीन दरानुसार सर्व कपात करून सफाई कामगारांना १४ हजार ५०० रूपये, कक्ष सेवकाला १२९०० रूपये व सुरक्षारक्षकाला १२ हजार ५०० रूपये एवढे वेतन दर महिन्याला मिळायला पाहिजे.मात्र अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांसोबत संगनमत करून भ्रष्टाचार केल्याने सफाई कामगारांना महिन्याला ९४०० रूपये, कक्ष सेवक व सुरक्षा रक्षकांना प्रत्येकी ७८०० रूपये एवढा पगार देण्यात येतो.सर्व पदावर काम करणाऱ्या कामगारांचा हिशेब केल्यास प्रत्येक कामगाराला सरासरी दरमहा ५००० रुपये त्याच्या हक्काच्या पगारापेक्षा कमी मिळतात. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांविरुद आजपर्यंत कोणतीही कारवाई शासनस्तरावर झालेली नाही. दोषी कंत्राटदारांना सुध्दा अभय देण्याचे काम शासनस्तरावर सुरू आहे. कामगारांना मात्र नाहक शिक्षा भोगावी लागत आहे.म्हणून थकीत पगार एवढीच किमान वेतन देण्याची कोरोना योद्ध्यांची मागणी सुद्धा महत्त्वपूर्ण्

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here