खाटांचा ठणठणाट : घुग्घुस परिसरातील 22 कोरोना रुग्ण घेत आहेत घरीच उपचार

0
163

जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये बेडचा ठणठणाट
• घुग्घुस परिसरातील 22 कोरोना रुग्ण घेत आहेत घरीच उपचार
चंद्रपूर : जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये बेडची उपलब्धता नसल्याने ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना घरीच उपचार घेण्यास बाध्य केल्या जात आहे. या रुग्णांवर घरी आवश्यक ते उपचार होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांना तात्काळ बेडची उपलब्धता असलेल्या सेंटर मध्ये हलवून योग्य उपचार करावा अशी मागणी होत आहे. घुग्घुस परिसरातील चार गावातील तब्बल 22 कोरोना रुग्ण उपचाराअभावी घरीच आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड रूग्णांची तपासणी तपासणी करण्यात आली. दरम्यान चार गावांमधील घुग्घुस 17, नाकोडा 2, शेंगाव 2, म्हातारदेवी 1 असे एकूण 22 जण गुरुवारी 8 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्याना घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्राने प्राथमिक औषधे दिली होती परंतु लक्षणे तिव्र स्वरूपाचे असल्याने त्यांना चंद्रपूर येथील कोविड सेंटर येथे उपचारासाठी पाठविणे आवश्यक होते. सूत्रांच्या माहितीनुसार चंद्रपूरचा कोविड सेंटर बेड उपलब्ध नसल्यामुळे हे 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या घरी आहेत. त्यांना आवश्यक असलेले उपचार त्यांच्यावर होत नसल्याचे पहायला मिळत आहे.

वर्षभराच्या कार्यकाळात आता पर्यंत या परिसरातील गावातील 220 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत आणि 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. शहरातील प्राथमिक आरोग्य विभागाकडून कोविड चाचणी नित्यनियमाने होत आहे. त्यामुळे बाधित रूग्णांवर कोविड सेंटर मध्ये उपचार करावा जेणे करून त्याच्यावर योग्य उपचार होईल. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशत पसरणार नाही, असे नागरिकांचे म्हणने आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here