हिंगुलांबीका माता प्रकट दिन संपन्न*

0
177

*चंद्रपूर* भावसार युवा एकता महिला आघाडी चंद्रपूर च्या वतीने फाल्गुन वद्य त्रयोदशीला हिंगुलांबीका माता प्रकट दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला भावसार समाजाचे कुल दैवत हिंगुलांबीका माता प्रकट दिनाला समाजातील अनेक मान्यवर उपस्तीत होते अध्यक्ष स्थानी योगिता धानेवार,प्रमुख मार्गदर्शक अभिलाषा मैंदळकर,छाया बरडे,प्रीती लाखदिवे,कांता दखणे,मीनाक्षी अलोने,वैशाली जोगी,आस्था गोजे,अर्चना अलोने,पायल बरडे,लता जोगी, प्रगती सरागे आदी उपस्तीत होते.
मंदिर परिसर रांगोळ्यांनी सजविण्यात आले,दिव्याची आरास मांडण्यात आली,पाकिस्थान स्थित बलुचिस्थान येथील हिंगुलांबीका देवीच्या मंदिराची प्रतिकुती रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली अध्यक्षा योगिता धानेवार यांनी मातेच्या प्रकट दिनाचे महत्व उपस्तीत भक्तापुढे मांडले आराध्य कुल देवीची उपासना कशी करायची व पुण्य पदरात कसे घ्यायचे हे भक्तांना उपदेश केला प्रमुख मार्गदर्शक अभिलाषा मैंदळकर आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणजे पाकिस्थान येथील बलुचिस्थान स्थित हिंगुलांबीका माता शक्तीपीठ होय येथे माता सतीचे शीर स्थापित झाले होते व या पुण्य स्थळीं शक्तीपीठ निर्माण झाले येथेच भाव व सार यांना देवीने शरण दिले.तेव्हा पासून हिंगुलांबीका माता भावसारांचे आराध्य कुल दैवत झाले.मातेचा इतिहास व महात्म्य भक्तापुढे मांडण्यात आले हिंगुलांबीका मातेची महा आरती करुन प्रसादाचे वाटप करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here