राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, पुढचे १५ दिवस राहणार संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरें

0
866

 

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, त्यासाठी सोमवारी दिवसभर बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर, अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊन मी म्हणणार नाही, पण कडक निर्बंध म्हणत नियमावलींची घोषणा केली आहे. त्यामुळे, गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून आता राज्यात उद्या म्हणजेच 14 एप्रिल रोजी रात्री 8 पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मी नाईलाजाने हे निर्बंध लादत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

*◼️◼️◼️ब्रेकिंग*
*उद्या संध्यकाळी 8 पासून काय सुरु काय बंद…*

📌उद्या संध्यकाळी 8 पासून
राज्यात निर्बंध….
📌उद्या संध्यकाळपासून ब्रेक द चेन या मोहिमेतर्गत 144 कलम लागू..
📌उद्यापासून राज्यात संचारबंदी
📌अत्यावश्यक काम नसेल तर कोणीही बाहेर पडू नये…
📌सर्व आस्थापना बंद राहतील (अत्यावश्यक सेवा वागळता)
📌सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहणार नाही… त्याचा वापर केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच
📌रुग्णालये, मेडीकल, लस उत्पादक, वाहने, मास्क इत्यादि सुरु..
📌हवाई वाहतूक, रेल्वे, सुरु
📌पावसाळी कामे सुरु राहतील
📌बँक, इ- कॉमर्स सुरु
📌पेट्रोल पंप सुरु राहतील
📌हॉटेल्स, बार बंद,
फक्त पार्सल सुरु
📌सकाळी 7-8 रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्री पार्सल सुरु…

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
📌राज्यसरकराकडून अन्न सुरक्षा योजनेतर्गत लाभार्त्यांना पुढील एक महिना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ (प्रत्येकी)
📌पुढील एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी मोफत
📌कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत 1500 रुपये प्रत्येक
📌अधिकृत फेरीवाले यांना प्रत्येकी 1500 रुपये..
📌परवानधारक रिकशाचालक प्रत्येकी 1500 रुपये
📌आदिवासी कुटुंबाना एक वेळचे 2000 रुपये
📌 3 हजार 300 कोटी फक्त कोविड साठी

*एकूण 5 हजार 400 कोटी रुपये निधी*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here