सीबीएसईच्या बोर्डाच्या परीक्षा (CBSE Board Exams 2021) घेण्या न घेण्याबाबत सरकारचा निर्णय

0
82

देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता CBSE Board Exams 2021 रद्द करण्याच्या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल (Education Minister Ramesh Pokhriyal), शिक्षण सचिव आणि इतर अधिकाऱ्यांध्ये ही महत्त्वाची चर्चा पार पडली आहे. या बैठकीत विद्यार्थ्यांविषयी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली, 14 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल, शिक्षम सचिव आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांबरोबर आज चर्चा केली. या बैठकीत सीबीएसईच्या बोर्डाच्या परीक्षा (CBSE Board Exams 2021) घेण्या न घेण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीमध्ये परीक्षा घेण्याच्या शक्यतेविषयी एक आराखडा पंतप्रधानांसमोर मांडण्यात आला. गेल्यावर्षीप्रमाणे ऑनलाइन परीक्षांचा मुद्दाही यामध्ये होता. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता CBSE Board Exams 2021 रद्द करण्याच्या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अधिकाऱ्यांध्ये ही महत्त्वाची चर्चा पार पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here