महामानवांनी जातिव्यवस्थेचे साखळदंड तोडून दिला समानतेचा अधिकार – आ. किशोर जोरगेवार

123
महामानवांनी जातिव्यवस्थेचे साखळदंड तोडून दिला समानतेचा अधिकार – आ. किशोर जोरगेवार
महामानव  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले अभिवादन

जातिव्यवस्थेचे साखळदंड तोडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातून सर्वांना समान हक्क व अधिकार मिळवून दिल्यानेच देशातील उच्च निच्च असा भेदभाव नष्ट झाला. मानवाला खरी ओळख मिळाली. त्यामुळेच मानव प्रगतीचे उच्चांक गाठत आहे, असे उद्गार आमदार किशोर जोरगेवार यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुुतळ्याला पूष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना केले. यावेळी यंग चांदा ब्र्रिगेडच्या विदयार्थी शाखेचे अध्यक्ष अजय दुर्गे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे आदींची  उपस्थिती होती.