शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे यांची तडकाफडकी बदली

199

चंद्रपूर (प्रतिनिधी): 16 एप्रिल 2021
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कोरोना स्फोटानंतर परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून महाविद्यालयातील वरीष्ठ विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र सुरपाम यांच्याकडे प्रभार दिला जाण्याची शक्यता आहे.
रुग्णसुविधा उभारण्यावरून पालकमंत्री वडेट्टीवार आणि जिल्हाधिकारी नाराज असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातील 8500 बाधितांपैकी 1000 रुग्ण आहेत गंभीर असून जिल्ह्यात नव्या खाटा- ऑक्सिजनयुक्त बेड- व्हेंटिलेटरवाढ करण्यात अधिष्ठाता यांना अपयश आले होते. महाविद्यालयातील 500 कंत्राटी कामगार किमान वेतनाचा मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 महिन्यापासून डेरा आंदोलन करीत असून त्यांच्या मागणीकडे कानाडोळा करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण विभाग आणि कामगार विभागातील ताळमेळ नसल्याने प्रश्न चिघळला आहे. अधिष्ठात्यांच्या बदलीने जिल्ह्यातील कोरोना उपचारातील अक्षम्य हलगर्जीपणा पुढे आला असून अधिष्ठाता यांच्या बदलीने जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात येणार का असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे.