विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

157

तौल गेल्याने विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू
⭕ पोंभूर्णा तालूक्यातील बोर्डा दिक्षीत येथील घटना
चंद्रपूर (प्रतिनिधी): 19 एप्रिल 2021
पोंभूर्णा तालूक्यातील बोर्डा दिक्षीत येथील १८ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यु झाल्याची घटना आज सोमवारी (19 एप्रिल) ला सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. सुरज कालीदास पेंदोर असे मृत तरुणाचे नाव आहे.
सदर तरुणाचा नेहमी प्रमाणे पाणी आणायला घराशेजारच्या विहिरीवर गेला होता. विहीरीतून पाणी काढताना अचानक त्याला भोवळ आली. त्यामुळे तोल जाऊन विहिरीत पडला. यावेळी विहीरीवर कुणी नसल्याने त्याच्या मदतीस कुणी धावू शकले नाही. काही वेळाने महिला पाणी आणायला गेल्या महिलांना विहीरीत मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. या घटनेची माहिती तात्काळ पोंभूर्णा पोलीसांना देण्यात आली. पोंभूर्णा पोलीसांनी घटनास्थळी येवून मृतदेह विहीरीबाहेर बाहेर काढून शव विच्छेदनासाठी गोंडपिपरी येथील रूग्णालयात पाठवीले आहे. पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहेत.