लसिकरण केंद्रावर शिक्षकाची जेष्ठ नागरिकास मारहाण

0
238

लसिकरण केंद्रावर शिक्षकाची जेष्ठ नागरिकास मारहाण
⭕ बिबी येथील आरोग्य उपकेंद्रातील प्रकार
⭕ नागरिकांनी व्यक्त केला संताप

चंद्रपूर (प्रतिनिधी): 20 एप्रिल 2021
कोरपना तालुक्यातील बिबी येथील आरोग्य उपकेंद्रावर आज 20 एप्रिल पासून कोव्हीड १९ चे लसिकरण करण्यास सुरुवात झाली. या केंद्रावर पहिल्याच दिवशी बिबी येथील लसिकरण केंद्रावरील रांगेत असलेल्या
एका जेष्ठ नागरिकास मारहाण करण्यात लाल्याची घटना घडली आहे. जेष्ठ नागरिक सुधाकर तांबरे (वय ६५) यांना हातावर व डोक्यावर जबर मारहाण झाल्याने ते जखमी झाले आहेत. या घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
जेष्ठ नागरिक सुधाकर तांबरे हे लसिकरण केंद्रावर कोव्हीड १९ लस घेण्यासाठी आले होते. नियोजित वेळ तसेच लाईननूसार व दुस-या क्रमांकावर ते उभे होते. नांदाफाटा येथील शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कुल येथे कार्यरत शिक्षक विठ्ठल टोंगे यांचा सदर केंद्रावर कुठलाही संबंध नसतांना लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांवर अरेरावी करत होते. तांबरे यांचा लस घेण्याचा दुसरा क्रमांक होता मात्र त्यांना जावू दिले नाही. यातच टोंगे यांनी नागरिकांच्या समोर जेष्ठ नागरिक तांबरे यांना मारहाण केली. यात तांबरे यांना डोक्याला व कमरेला बुक्यांनी मारहाण केल्याने दुखापत झाली. केली. पहिल्याच दिवशी लसिकरण केंद्रावर झालेल्या या प्रकारामुळे बिबी येथील नागरिकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.
=============
मी कोरोनाची लस घेण्यासाठी बिबी आरोग्य उपकेंद्रावर रांगेत हजर होतो. माझा दुसरा नंबर होता. पण मला विठ्ठल टोंगे या खाजगी शिक्षकाने जावू दिले नाही. मला सगळ्यांच्या समोर मारहाण केली. माझ्या डोक्याला व पाठीवर मारहाण केली. माझ्या हाताला गंभीर दुखापत झाली असून रक्त लागले. मला मारायला खुर्ची उचलली. वडीलांसारख्या जेष्ठ नागरिकांवर हात उचलणे हे एका शिक्षकाला शोभत नाही,असी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
: *सुधाकर तांबरे, ज्येष्ठ नागरिक बिबी*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here