मान्यता प्राप्त कोविड सेंटर ला स्वबळावर बोलविता येईल रेमडीसीवर इंजेक्शन

0
166

मान्यता प्राप्त कोविड सेंटर ला स्वबळावर बोलविता येईल रेमडीसीवर इंजेक्शन

जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

नियंत्रणासाठी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक

महानगर भाजपाच्या प्रयत्नाला यश

माजी पालकमंत्री,विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी महानगर व जिल्हा प्रशासन यांच्यात बुधवारी(२१एप्रिल)झालेल्या एका बैठकीत रेमडीसीवर इंजेक्शन बाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने रुग्णांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.या निर्णयानुसार आता मान्यताप्राप्त कोविड रुग्णालयास रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देता येणार आहे.एफ डी आय चा यात हस्तक्षेप राहणार नाही.असे असले तरी यावर जिल्हाप्रशासनाचे नियंत्रण राहणार असून त्याकरिता एका वैद्यकीय अधिकारीची नेमणूक यासाठी केली जाणार आहे. रुग्णाला इंजेक्शनची गरज आहे किंवा नाही यावर ते निर्णय घेतील.असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,महापौर राखी कंचर्लावार,जिप अध्यक्ष संध्याताई गुरनुले,उपमहापौर राहुल पावडे,स्थायी समिती सभापती रवी आसवानी,भाजपा महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांची उपस्थिती होती.

यावेळी चर्चेत बोलतांना डॉ मंगेश गुलवाडे म्हणाले,संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.   कोरनाच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने शासनाने तयारी करायला हवी होती तशी केलेली दिसत नाही. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूचेही प्रमाण वाढत चालले आहे. रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे कमी तर उपचाराअभावी जास्त प्रमाणात होत आहे. उपरोक्त परिस्थिती लक्षात घेतली असता, या भयावह संकटात सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. एकीकडे जनता दारोदार भटकत आहे तर दुसरीकडे प्रशासनिक स्तरावर ठोस पाऊल उचलले जात नाही ही या पुरोगामी महाराष्ट्राची शोकांतिकाच म्हणावी लागेल. जिल्ह्यातून सर्व रुग्ण जिल्हास्थानी येत असताना त्यांना इतर अडचणींचा पण सामना करावा लागत आहे. बरेचसे रुग्ण रुग्णवाहिका मध्येच दगावत असल्याचे चित्र आहे.हे होत असताना ऑक्सिजनचा पुरवठा, रेमेडी रिसिवर इंजेक्शन इत्यादींचे नियंत्रण आपणाकडे आहे.त्यातून काही साध्य होताना दिसत नाही.त्यामुळे या समस्येवर गांभीर्याने विचार करावा असे ते म्हणाले.
रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपसी समन्वयातून रुग्णसेवा होणे गरजेचे आहे. भारतीय जनता पार्टी जनसेवेसाठी तत्पर असून जिल्हा प्रशासनासोबत समन्वयाने काम करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ही संपूर्ण ढेपाळली व्यवस्था सांभाळण्यासाठी  आम्ही आपले सहकार्य करु असे आश्वासन त्यांनी दिले.
यावर चर्चा करीत जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन देत,कोरोनाग्रस्त रुग्णांना रेमडीसीवर इंजेक्शन त्वरित उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत यावर नियंत्रणसाठी एक वैद्यकीय अधिकारी नेमणार असल्याचे सांगत,मान्यताप्राप्त कोविड रुग्णालयास रेमडीसीवर इंजेक्शन स्वबळावर उपलब्ध करून देण्याची परवानगी बहाल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here