अखेर विलास मोहिनकर यांच्या वर चिमूर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

0
1358

 

 

चिमूर

चिमूर येथील हिलींग टच हॉस्पिटल ला जिल्हा प्रशासनाने डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर मान्यता दिली असताना चिमूर येथील पत्रकार विलास मोहिनकर यांनी समाज माध्यमात खोटी माहिती पसरवून हास्पिटल ची बदनामी केली असल्याने हिलींग टच हॉस्पिटल चे सीएमडी अश्वमेघ बुटके यांनी चिमूर पोलीस स्टेशन ला तक्रार केली असता पालकमंत्री तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वड्डेटीवार यांचे कडे दिलेल्या निवेदनातून विलास मोहिनकर यांचे वर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी हिलींग टच हॉस्पिटल चे सीएमडी साईनाथ उर्फ अश्वमेघ बुटके, डॉ अभिषेक निमजे डॉ सुधीर बुटके यांनी केली आहे

सध्या कोविड प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असून शेकडो रुग्ण मृत्युमुखी पडत आहे तेव्हा राज्य शासन व आरोग्य विभाग प्रयत्न करून कोविड चा सामना करीत आहे त्यात डॉक्टर ,नर्स व आदी कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड चा सामना करीत आहे
चिमूर येथील हिलींग टच मल्टिस्पेशालिस्ट हास्पिटल ला प्रशासनाने डेडिकेट कोविड हेल्थ सेंटर म्हणून मान्यता मिळाली असून रुग्ण उपचार करीत आहे त्यात हॉस्पिटल मधील डॉक्टर ,नर्स व आदी कर्मचारी प्रयत्नांची शिकस्त करीत आहे आपत्ती जनक स्थितीत बाधित रुग्णांवर उपचार करीत सेवा देत आहे प्रशासनास सहकार्य करीत आहे
अश्या आपत्ती जनक स्थितीत सामाजिक दायित्व न ठेवता विलास मोहिनकर यांनी दि 23 एप्रिल रात्रौ 11.30 वाजता दरम्यान दवाखान्यात मध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना धमकावून दवाखान्याची ची तोडफोड करून डॉक्टर व स्टाफ ला मारहाण करून निर्दयी नुकसान केली आहे दवाखान्याबाबत नाहक बदनामी कारक वृत्त समाज माध्यमात पसरवून त्रास देणे सुरू केले आहे

हिलींग टच मल्टिस्पेशालिस्ट हास्पिटल मध्ये रुग्णांची व बधितांची चांगल्या प्रकारे व्यवस्था केली जात असताना देखील आपत्ती काळात कोरोना बाधितावर सेवा उपचार देत असलेल्या कर्मचाऱ्यांना विलास मोहिनकर त्रास देत असल्याने विलास मोहिनकर यांचे वर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी हास्पिटल चे सीएमडी साईनाथ उर्फ अश्वमेघ बुटके ,डॉ अभिषेक निमजे, डॉ सुधीर बुटके यांनी पालकमंत्री तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार विजय वड्डेटीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली असून जिल्हाधिकारी ,जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी, एसडीओ ,एसडीपीओ चिमूर, तहसीलदार ,पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन चिमूर यांना सुद्धा प्रतिनिवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे
दरम्यान चिमूर पोलीस स्टेशन ला केलेल्या साईनाथ उर्फ अश्वमेघ बुटके यांच्या तक्रारी नुसार विलास मोहिनकर यांच्यावर भांदवी 323, 427, 504 ,506,507 गुन्हे दाखल करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here