वाहन परवाना नसताना युपी, बिहार मधील वाहन करतात महाराष्ट्रात माल वाहतूक

0
117

चंद्रपूर प्रदेशिक परिवहन अधिकारी यांच्या नाकावर टाचणी टोचून युपी बिहार राज्यातील वाहन परवाना नसताना सुद्धा राज्यात माल वाहतूक करत आहे

बल्लारपूर- अक्षय भोयर (ता,प्र)

चंद्रपूर हा औधोगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो , येथून इतर राज्यात माल वाहतूक होते ,बल्लारपूर पेपर मिल येथून पेपर तयार होणारा कागदी लड्डा बिगवन इंदापूर एम आय डी सी ला जातो , परंतु त्यात वाहतूक करणारे वाहन हे इतर राज्यातील आहे . त्यात युपी बिहार राज्यातील वाहक परवाना नसतांना सुद्धा महाराष्ट्रात माल वाहतूक करत आहे , शासनाच्या महसुल बिनधास्त पणे स्वताच्या गळाला लावून
चंद्रपूर प्रदेशिक परिवहन अधिकारी यांच्या नाकावर टाचणी टोचून सर्रास पणे माल वाहतूक करत आहे . यात काही सर्व सामान्य जनतेला प्रश्न असा पडला आहे की , चंद्रपूर प्रदेशिक परिवहन अधिकारी यांना ट्रान्सपोटर तर काही चिरी मिरी देऊन शांत ठेवत नाही आहे किंवा माल वाहतूक करणारे वाहन चालक तर स्वता काही फुल नाही फुलांची पाखळी देत तर नाही ना , किंवा चंद्रपूर प्रदेशिक परिवहन अधिकारी यांना अश्या बेकायदेशिर माल वाहतुकीकडे लक्ष देण्याकरिता वेळ नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here