अवैध कोविड रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाची कारवाई *अवैधरित्या कोविड रुग्णांवर सुरू होते उपचार.

300
SSUCv3H4sIAAAAAAAEAH2Ry27DIBBF95X6DxZrW8W145r+Q1dZRl3wmLijYIgAp4oi/3vBD5VF1R33DHeYOzyen4qCCO5RkvfikVTUqPXkg+MBrYm4LjcOCoN1yHWENLF5qRAfeJg8+NRiQ5IHGOLdFW7+/Z3Tqou9sBSjI5YIKTPmJ7GwHc3lP84jDsa/HO+jsNr/1eYDvQStuQE7+d+e6+FzD8kHMPK+RMkiOtDA14in9Sq5fAdwYx76hgpspvmk0Gb5b1ZynQxN1vnqUKIZMpsNX+DyXcbPsGMGjA3LJNuyiIrLTrJu6obRvntte9oyRikl+wdZeUGVz4oqOQR9Y52kUPXnllUtO7OKy6aruoNoxfkgRS3auKn5B2ik6D0oAgAA

*अवैध कोविड रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाची कारवाई
*अवैधरित्या कोविड रुग्णांवर सुरू होते उपचार.

चंद्रपूर दि. 7 मे : कोरोना रुग्णांच्या असहाय्यतेचा फायदा घेत कोणतीही परवानगी न घेता अवैधपणे कोविड रुग्णालय चालविणाऱ्या चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे. अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात सुद्धा रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार होत असले तरी खासगी रुग्णालयाकडे जाऊन उपचार करण्यावर अनेकांचा कल असल्याने मान्यता नसलेल्या खासगी रुग्णालयांनी त्या परिस्थितीचा फायदा घेत कोविड रुग्णांवर उपचार केला जात असल्याचे पुढे आले आहे.

जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयासमोरील शफिक क्लिनिक डॉ. शफिक शेख यांच्या रुग्णालयाला कोणत्याही प्रकारची नोंदणी नसतांना व शासनाची कोणतीही मान्यता नसतांना अनधिकृतपणे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे ,अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्यासमवेत रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी केली असता कुठलीही परवानगी नसतांना देखील अवैधपणे कोविड रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आढळले. प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये सदर रूग्णालयात रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा, औषध साठा यांची तपासणी करण्यात आली असून अवैधरित्या साठविलेली औषधे-इंजेक्शन आणि अन्य साहित्याची जप्ती करण्यात आलेली आहे.

सदर रुग्णालयावर मुंबई नर्सिंग होम ॲक्ट 2006 चे कलम 6,12 व महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट 2006 चे कलम 16,27, साथरोग प्रतिबंधक कायदा-1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

तसेच कोविड ग्रस्त रुग्णांच्या उपचारांमध्ये आढळणाऱ्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या मार्गदशनाखाली सहा तहसीलदार, सहा लेखापरीक्षक व सहा डॉक्टर अशा टीम तयार करून त्यांच्यामार्फत सर्व खाजगी डेडीकेटेड कोविड हास्पीटल व डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथील आरोग्यविषयक सोयीसुविधांची तपासणी करण्यात आली.
सदर तपासणीमध्ये आरोग्य विषयक सोयी-सुविधेमध्ये तफावत आढळून आल्यास कारवाई करण्यात येत आहे.

खाजगी कोविड केअर सेंटर व खाजगी रुग्णालयांनी शासनाच्या नियमांचे पालन करून रुग्णांना सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी केले आहे.