बल्‍लारपूर येथे 100 बेडेड कोविड केअर सेंटर सुरू

0
218

 

बल्लारपूर- अक्षय भोयर(ता,प्र)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने रूग्‍णांना उत्‍तम आरोग्‍य सुविधा पुरविणे ही आपली प्राथमिकता असुन लवकरच बल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुलात 100 बेडेड डीसीएचसी रूग्‍णालय सुरू होणार आहे. यात 70 नॉन ऑक्‍सीजन बेड तर 30 ऑक्‍सीजन बेड राहतील. हवेतुन ऑक्‍सीजन घेणारा प्‍लॅन्‍ट लवकरच बल्‍लारपूर नजिक उभारणार असल्‍याचे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा वित्‍तमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नागरिकांनी सुध्‍दा नियमांचे पालन करत आपली व कुटुंबाची काळजी घेण्‍याचे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.

दिनांक १० मे रोजी बल्‍लारपूर शहरानजिक भिवकुंड विसापूर येथील सामाजिक न्‍याय विभागाच्‍या इमारतीत 100 बेडेड कोविड केअर सेंटर सुरू करण्‍यात आले. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासह बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, मुख्‍याधिकारी विजय सरनाईक, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, काशिसिंह, निलेश खरबडे, समिर केने, मनिष पांडे यांची उपस्थिती होती.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या स्‍थानिक विकास निधीतुन 2 रूग्‍णवाहीका उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या. या रूग्‍णवाहीकांच्‍या चाव्‍या नगराध्‍यक्ष हरीश शर्मा यांना सुपुर्द करण्‍यात आल्‍या. त्‍याचप्रमाणे 100 पिपिई किटचे वितरण सुध्‍दा करण्‍यात आले. बल्‍लारपूरसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या सहकार्याने 10 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध करण्‍यात आले आहे. बल्‍लारपूर शहर व तालुक्‍यातील नागरिकांना चाचण्‍यांचा लाभ सहज घेता यावा यादृष्‍टीने बल्‍लारपूर शहरात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने दुसरे आरटीपीसीआर चाचणी केंद्र सुध्‍दा सुरू करण्‍यात आले आहे. नगराध्‍यक्ष हरीश शर्मा यांनी यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्‍यक्‍त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here