बल्लारपूर शहर काँग्रेस कमेटी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

57

 

बल्लारपूर- अक्षय भोयर (ता,प्र)

रक्तदान हे श्रेष्ठ दान असा जय जयकार करत आज बल्लारपूर काँग्रेस कमेटी तर्फे रक्तदान शिबिराचे उदघाटन करून रक्तदात्यानी रक्त देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली
जिल्ह्याचे पालक मंत्री विजय वडेट्टीवार, यांच्या आदेशाने काँग्रेस खासदार बाळूभाऊ धानोरकर , काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे, यांच्या मार्गदर्शनात,
काँग्रेसचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते कोरोना महामारीत सुद्धा जनतेच्या सर्वोतोपरी मदत करन्यासाठी तयार आहे ,असे प्रतिपादन काँग्रेसचे शहर अध्यक्ष अब्दुल करीम यांनी उद्धघाटना वेळी केले . महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी सदस्य घनश्याम मूलचंदानी या वेळी म्हणाले की शहरात काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल करीम यांच्या नेतृत्वात आज रक्तदान शिबिर आयोजित केले असून मागील काही दिवसात बल्लारपूर शहर काँग्रेस कमेटी सर्वतोपरी लोकांना मदत करत आहे आपण असेच उत्तम कार्य करत राहावे आपल्याला व आपल्या संपूर्ण टीमला शुभेच्या,
या वेळी या कार्यक्रमात उपस्तीत महाराष्ट्र काँग्रेस कमेटी सदस्य घनश्याम मूलचंदानी,बल्लारपूर शहर काँग्रेस कमेटी शहर अध्यक्ष अब्दुल करीम शेख, महिला काँग्रेस तालुका अध्यक्षा महिला अफसाना सय्यद, महिला शहर अध्यक्षा ऍड,मेघाताई भाले, माजी नगराध्यक्षा छायाताई मडावी,
माजी नगराध्यक्ष दिलीपभाऊ माकोडे,नगर सेविका मीनाताई बहुरीया,माजी गटनेता देवेंद्र आर्या,इस्माईल ढाकवाला, जयकरणसिंह बाजगोती, डॉ,युवराज भासारकर, सतीश नंदाराम,नरेश मुंधडा, डेव्हिड कांमपेली, राजू बहुरीया मोहम्मद फारुख, जोशवा अंबाला , हरीश पवार, बाबूभाई, रवींद्र कोडपे,दौलत बुंदेल,कासीम शेख, परिस महाजनवार
आदी उपस्तीत होते रक्त पुरवठा घेणाऱ्या चमू कडे ४० युनिट असल्या अभावी काही कार्यकर्त्यांना रक्तदान करता आले नाही,