मैत्रीचा धागा घट्टपणे जोपासणारा मित्र गमावला : आ.सुधीर मुनगंटीवार

0
258
खा. राजीव सातव यांच्या निधनाने मैत्रीचा धागा घट्टपणे जोपासणारा मित्र गमावला : आ.सुधीर मुनगंटीवार
राजकीय मतभेदाच्या भिंती बाजूला सारून मैत्रीचा धागा घट्टपणे जोपासणारा मित्र गमावल्याचे दुःख झाल्याची भावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे.
विधानसभेच्या माध्यमातून झालेली आमची मैत्री झाली . ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मैत्रीचा धागा तसाच घट्ट ठेवला. आम्हा दोघांचे पक्ष भारतीय राजकारणातले  भिन्न विचारसरणीचे पक्ष असले तरी मैत्रीत त्यामुळे कधीही अंतर पडले नाही . त्यांच्या निधनाने एक सात्विक , सोज्वळ  व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणाची व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे , असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here