वृत्तपत्र विक्रेत्यांना फ्रंट लाइन वर्कर जाहीर करा!

0
195

वृत्तपत्र विक्रेत्यांना फ्रंट लाइन वर्कर जाहीर करा!
लवकरात लवकर नोंदण्या सुरू करा!
मुख्यमंत्र्यांना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देणार

Chandrapur
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक दिनांक 17/05/2021 रोज मंगळवारी संध्याकाळी 8.30 वाजता राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

सदर बैठकीत सुरूवातीला कोरोनाने निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर राज्य सरचिटणीस बालाजी पवार यांनी राज्यातील जिल्हावाईज कोरोना बाधीत व कोरोनाने निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांची तसेच राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणी विषयी व कोरोनामुळे किती नुकसान झाले आहे त्याची माहिती घेतली. कारण शासनाला किंवा व्यवस्थापनांना मागणी करतांना सदरील माहिती आवश्यक आहे असे पवार यांनी सांगितले.

या बैठकीत कोरोनामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळावी, कोरोनाची लस उपलब्ध करून दिली पाहिजे, निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कुटुंबाना आर्थिक मदत करावी, बाधितांना मदत करावी अशा प्रकारे अनेक मागण्या पुढे आल्या. यावर राज्य संघटनेच्या वतीने काही व्यवस्थापनाकडे निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विनंती केल्याची माहिती सरचिटणीस बालाजी पवार यांनी दिली. व्यवस्थापना कडून सकारात्मक विचार होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांनी सर्व व्यवस्थापण किंवा शासनावर अवलंबून न राहता आपण काहीतरी केले पाहिजे असे मत व्यक्त केले. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याचे सांगून आपल्या सारखे अनेक व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे असे म्हणाले. तसेच आपापल्या जिल्ह्यातील राजकीय नेते, मंत्री यांच्या कडे निवेदन दिले पाहिजे. त्यांच्याशी संपर्क साधावा असेही पाटणकर म्हणाले.

या बैठकीत महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांना आर्थिक मदत मिळावी, फ्रंट लाइन वर्कर म्हणून घोषित करावे, जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना लस उपलब्ध करून देण्यात यावी, वृत्तपत्र विक्रेता कोरोना लस शिबीर आयोजित करावे, बाधित व सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना असंघटित कामगार म्हणून आर्थिक मदत मिळावी, असंघटित कामगार म्हणून लवकरात लवकर नोंदण्या सुरू कराव्यात, अभ्यास समितीचा अहवाल लागू करावा इत्यादी मागण्यांचे निवेदन एकाच दिवशी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी जिल्ह्याधिका-या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, कामगार मंत्री, आरोग्य मंत्री यांना देण्याचे ठरले.
बैठकीच्या शेवटी सुनील पाटणकर यांनी अध्यक्षीय समारोप करतांना सर्व पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांनी संघटनात्मक कामाला लागावे असे आवाहन केले. सरचिटणीस बालाजी पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपाध्यक्ष अण्णासाहेब जगताप, संघटन सचिव रवींद्र कुलकर्णी, शिवाजी खेडकर, कोकण विभाग निमंत्रक प्रभारी दत्ता घाडगे का. सदस्य राजू टिकार, मनिष राजनकर, जगदिश उमरदंड, भारत माळवे, दत्ता ठाकरे यांनी आपापल्या जिल्ह्यातील माहिती सादर केली. तसेच बैठकीत कोषाध्यक्ष गोरख भिलारे मनिष वासनिक, सुर्यकांत टेंबे, महेश कुलथे, रविंद्र कांबळे, किशोर सोनवणे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here