भुकेल्यानंसाठी देवदूत ठरला जिवती तालुक्यातील युकांचा ग्रुप*

0
149

 

जिवती प्रतिनिधि-

माणसाला पोटाची भूक स्वस्थ बसू देत नाही,कोरोना काळात पोटाची खळगी भरण्यासाठी जिवती तालुक्यातील कुटुंब दोरीवरची कसरत करीत होते.याची दखल घेत तालुक्यातील काही यवकांनी ज्याला जमेल ते पैसे गोळा करून प्रत्येकी एक रेशन किट तयार केली यात ५ किलो तांदूळ,१ किलो साखर,५००ग्राम मसूर डाळ,हळद,मिरची,मीठ,२बिस्कीट पुळे व मास्क अशी किट पाटण येथील वडार मोहला,पाटागुंडा,भाईपटार कोलामगुडा,कलघोडी येथे एकूण १०० किट वाटण्यात आले असून या युकांच १००० किट वाटण्याचं मानस आहे.याच्या साठी पिटीगुडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शरद आवारे,विलास माने,फारुख शेख अध्यक्ष मराठी पत्रकार संघ जिवती,डा. मनोहर अलोने,डा. बिस्वास, युनिस मकवानी, अयुब शेख,नोगोराव मडावी,बापूराव मडावी,सतीश मडावी यांनी प्रत्येक गावात जाऊन रेशन किटचे वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here