सर्वच क्षिधापत्रिका धारकांनाही मोफत धान्य द्या. : महानगर भाजपाची मागणी

0
597
…त्या क्षिधा पत्रिकाधारकांनाही मोफत धान्य द्या.

महानगर भाजपाची  मागणी

जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यानां निवेदन.

कोरोनातील संकटात जनतेला मदतीचा हात देत केंद्र शासनाने मोफत धान्य, क्षिधापत्रिका धारकांना उपलब्ध करून दिले.जिल्ह्यातीलसर्व पात्र लाभार्थ्यांना मोफत धान्य द्यावे,अशी मागणी घेऊन महानगर भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्हाधिकाऱ्यां मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन शुक्रवार(21मे)ला पाठविण्यात आले.
यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, सचिव रामकुमार अकापेलिवार यांची उपस्थिती होती.

यावेळी चर्चा करतांना डॉ गुलवाडे म्हणाले, महाराष्ट्रात केंद्र शासनाच्या योजना राबवितां ना अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.
क्षिधापत्रिकाधारक गरीब जनतेला मोफत धान्य मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जनजीवन विस्कळीत केले आहे.यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉक डाउन सुरू आहे.अश्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर हातावर कमावून खाणाऱ्यांची दैना अवस्था आहे.म्हणून,या त्रस्त जनतेला मोफत धान्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.परंतु आपल्या जिल्ह्यात ३०/०६/२०१९ नंतरच्या क्षिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी भाजपाला प्राप्त झाल्या आहेत.याकडे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
केंद्राने निर्देश दिले असतांना धान्य न देणे ही बाब अत्यन्त गंभीर स्वरूपाची आहे.या प्रकरणी योग्य कारवाई करून जनतेला न्याय दयावा व कोरोना माहामारीच्या संकटात शासन जनते सोबत आहे,या बाबत जनतेत विश्वास निर्माण करावा.अशी मागणी त्यांनी केली.यावेळी सविस्तर निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here