“वृक्षसखा पुरस्कार” रोजगार संघ आयोजित राज्य स्तरीय वृक्षलागवड व संवर्धन स्पर्धा

0
192

रोजगार संघा च्या वतीने वृक्षसखा पुरस्कार (राज्य स्तरीय वृक्षलागवड, संवर्धन स्पर्धा) चे आयोजन करण्यात आले आहे

सर्व जग या वेळी अतिशय बिकट परिस्थितीतून वाटचाल करीत आहे याची जाणीव आपणास आहेच. ‘पर्यावरण’ हा विषय आपण अजूनही गांभीर्याने न घेतल्यास अशी संकटे वारंवार आपली परीक्षा घेत राहणार.त्यासाठी सर्व मानव घटकांनी वेळीच जागरूक होणे गरजेचे आहे,या जागृती साठी ‘रोजगार संघ ‘या संस्थेतर्फे राज्यस्तरीय भव्य वृक्ष लागवड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
“रोजगार संघ” ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक,रोजगार नोकरी संदर्भचे संपादक, मालक आणि असंख्य प्रेरणादायी पुस्तकाचे लेखक प्रा.संजय नाथे यांचे नेतृत्वाखाली विदर्भातील काही ध्येयवादी तरुणांनी एकत्र येत चालवलेली चळवळ आहे,सर्वांना रोजगार आणि गावाचा विकास हे स्वप्न उराशी घेऊन रोजगार संघ गत आठ वर्षा पासून वाटचाल करीत आहे .या वाटचालीत असंख्य गावे सोबतीला आली.आदर्श झाली.तरुणांना दिशा गवसली.. .. .पर्यावरण हा आपल्या सर्वांच्या जीवन मरणाचा विषय आहे.पर्यावरणाचे समृद्धीत सर्वांची समृद्धी सामावलेली आहे.मात्र पर्यावरणाचा ऱ्हास रोज होत असल्याचे आपण बघतो . या प्रश्नाचे सोडवणुकीसाठी आपणा सर्वांचा हातभार अपेक्षित आहे,यात आपण सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून भव्य ” वृक्ष लागवड” स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.जे अधिकाधिक वृक्षारोपण करून त्याचे योग्य संगोपन करतील त्यांना रोजगार संघा तर्फे ‘वृक्षसखा’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.आपण सर्वांनी पर्यावरण प्रश्नाकडे गांभीर्यपूर्वक बघावे ,त्यासाठी काही कृतीपूर्ण योगदान दयावे म्हणून ह्या उपक्रमाचे प्रयोजन. ■सद्या सर्वत्र करोना चा संसर्ग लक्षात घेता प्रत्येकाने नियमांचे योग्य ते पालन करीत या स्पर्धेत सहभागी व्हावे ही नम्र विनंती.

■पुरस्कार कोणाला मिळेल? — यात संस्थास्तरावर स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत, बचत गट,महिला मंडळ,युवक मंडळ,गुरुदेव सेवा मंडळ यांना तसेच वैयक्तिक स्तरावर कुणाही कार्यकर्त्यास सहभागी होता येईल.आपल्या कार्याची दखल रोजगार संघा तर्फे प्रकाशित भरारी विशेषांकात घेण्यात येऊन आपला यथायोग्य सन्मान रोजगार संघ वर्धापन दिनी म्हणजे 12 जानेवारी ला करण्यात येईल .

■–पुरस्काराचे स्वरूप —
संस्थेकरीता ‘वृक्षसखा’ पुरस्काराचे स्वरूप हे प्रथम पुरस्कार 50,000 /- रुपये ,द्वितीय पुरस्कार 25 हजार रुपये व तृतीय पुरस्कार 10 हजार रुपये ,शाल,श्रीफळ, स्मृती चिन्ह,सन्मान पत्र असे राहणार असून वैयक्तिक स्वरूपात प्रथम पुरस्कार 10 हजार ,द्वितीय पुरस्कार 5 हजार ,तृतीय पुरस्कार 3 हजार रुपये शाल,श्रीफळ, स्मृती चिन्ह व सन्मानपत्र असे राहील. (वरील तिन्ही पुरस्कारात अर्धी रक्कम रोख स्वरूपात तर अर्ध्या रक्कमेत पुस्तकांचा समावेश राहील)

■भरारी विशेषांक —
रोजगार संघाच्या वर्धापन दिनी म्हणजे 12 जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात येणाऱ्या’भरारी ‘ या विशेषांकात विजेत्यांच्या कार्याचा समावेश करण्यात येईल. हा विशेषांक राज्य शासन, जि. प. पदाधिकारी, अधिकारी तसेच राज्यातील सर्वच वृत्तपत्रांच्या संपादकांना पाठवण्यात येईल. प्रथम विजेत्याला मुखपृष्ठावर स्थान देण्यात येईल.

● स्पर्धा -नियम व अटी ———————– 1) स्पर्धेचे स्वरूप हे संस्थात्मक तसेच वैयक्तिक असणार आहे.
2) स्पर्धेचा कालावधी हा 1/06/2021ते 1/12/2021पर्यन्त असणार आहे .
3) वृक्ष लागवड केल्या पासून 1 डिसेंबर 2021पर्यंत आपण केलेल्या वृक्ष लागवडिचे फोटो स्पर्धकांचे नाव,वृक्ष लागवड केलेल्या ठिकाणाचा स्पष्ट उल्लेख करून पाठवायचे आहे,स्पर्धकांनी सरपंच ग्रामपंचायत, वा स्थानिक नगरसेवक यांचे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे (फोटो 6 पेक्षा अधिक असू नये ).
4) गावातील मृत व्यक्ती च्या स्मृती प्रित्यर्थ स्मशानभूमीत वृक्षारोपण करून स्मशानभूमी रमणीय केलेल्या ‘स्मृतीउद्यानाला’ या स्पर्धेत प्राधान्य देण्यात येईल
5) वृक्ष लागवड आपण सार्वजनिक, खाजगी जागेत करू शकता. परंतू लावलेली झाडे जास्तीत जास्त कशी वाचतील यावर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण काय नियोजन केले आहे याची माहिती लिखित स्वरूपात पाठविणे आवश्यक आहे.
6) झाडे लावतांना कडूनिंब ,वड,पिंपळ, करंजी, कवठ, आंबा,अशी देशी झाडे जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न केल्यास उत्तम.
7) 1/06/2021 ते 1/12/2021पर्यंत केलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमाचा 100 शब्दात अहवाल व कार्यक्रम राबविल्याचे 6 फोटो 1/12/2021पूर्वी पोहचतील या बेताने पाठवावीत.
8) आपण केलेल्या वृक्ष लागवडीची तपासणी रोजगार संघ कार्यकर्त्यां कडून प्रत्यक्ष भेट देऊन करण्यात येईल. 9)स्पर्धेच्या बाबतीत आयोजन समितीचा निर्णय अंतिम राहील. ___________________
आयोजक
रोजगार संघ नागपुर.
__________________

■ बक्षीस वितरण रोजगार संघ वर्धापन दिनी दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी नागपुर येथे करण्यात येईल. ■ फोटो व अहवाल —
कार्यालय प्रमुख -रोजगार संघ , c/o नाथे पब्लिकेशन, मेडिकल चौक नागपूर
या पत्यावर किंवा खालील WhatsApp क्रमांकावर पाठवावेत. ■अधिक माहिती साठी सम्पर्क — ,(1)गजानन बोबडे -कार्याध्यक्ष 7757020975
(2)उध्दव साबळे- सरचिटणीस 8788154968 (3)दत्ताभाऊ कडुकर – तालुकाध्यक्ष धामणगाव (रेल्वे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here