लोकसत्ता पुरस्कृत “श्री. सी.डी.देशमुख विशेषांक”

0
140

लोकसत्ता पुरस्कृत

“श्री. सी.डी.देशमुख विशेषांक”

श्री चंद्रकांत द्वारकानाथ देशमुख हे भारतीय प्रशासकीय सेवेतील एक आदराचे स्थान असलेले व्यक्तिमत्व. आपल्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा या गावाचे सुपुत्र, असे प्रतिभावान की ज्यांच्या बुद्धिमत्तेला इंग्रजानीही सलाम केला होता. 1943 साली त्या वेळच्या ब्रिटिश सरकारकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या गव्हर्नर पदी नेमणूक झालेले पाहिले भारतीय, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थापन झालेल्या केंद्र सरकारमधील पहिले अर्थमंत्री अशी त्यांची ख्याती.

अशा या असामान्य व्यक्तिमत्वाच्या कर्तृत्वाला वंदन करण्यासाठी, त्यांच्या असामान्य उपलब्धीला उजाळा देऊन त्यांची महत्ता आताच्या पिढीला ज्ञात व्हावी या उद्देशाने लोकसत्ता एक खास विशेषांक प्रसिद्ध करत आहे. या विशेषांकामध्ये प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ञ श्री विजय केळकर, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर श्री रघुराम राजन, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विरोधी पक्षनेते श्री देवेंद्रजी फडणवीस आणि अन्य मान्यवरांचे विशेष लेख असणार आहेत.

संग्राह्य मूल्य असणारा हा विशेषांक सरकारी,खाजगी वाचनालये, शाळा , महाविद्यालय, स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी आणि बुद्धिजीवी वाचक या सर्वांसाठी एक अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त असे साहित्य ठरणार आहे.

सदरचा विशेषांक 29 मे रोजी प्रसिद्ध होत असून या अंकाची दर्शनी किंमत 60/- रुपये असणार आहे.

आपणांस निवेदन आहे की आपण आपली या विशेषांकाची आगाऊ मागणी आमच्या वितरण प्रतिनिधीकडे लवकरात लवकर नोंदवावी.

पृष्टसंख्या १०० पाने
किंमत – ६०/-
प्रसिद्धी दिनांक – २९ मे
अधिक माहितीकरिता संपर्क
शरद भुते, लोकसत्ता,
📞 9096050740

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here