पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

0
305

अवैध दारू विक्रेत्याचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न ⭕ स्वच्छतागृहात जाऊन केले हारपीक सदृश्य द्रावन केले
प्राशन
⭕ पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप
चंद्रपूर (प्रतिनिधी): 23 मे 2021

जिल्ह्यातील सावली पोलीस ठाण्यात अवैध मोहफुल दारू विक्री प्रकरणातील आरोपीने स्वच्छतागृहात फिनाईल सदृश्य द्रावण प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली असुन ह्या घटनेने संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, सावली येथे दिनांक 22 मे 2021 रोजी पोलिसांनी गस्तीदरम्यान तालुक्यातील किसान नगर भागात धाड घालुन अवैध मोहफुल दारूविक्री करणार्‍यांना अटक करण्याच्या कारवाई दरम्यान आरोपींनी पोलिसांनाच धक्काबुक्की करून आकाश गरीबचन्द मजोके, गरीबचन्द मजोके आणि अदन्यान हे चारही आरोपी पळुन जाण्यात यशस्वी ठरले होते. मात्र संध्याकाळच्या दरम्यान गरीबचंद ह्यांच्या पत्नीने दोन्ही मुले व पतीला पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करायला लावले.
दरम्यान पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. मात्र पहाटेच्या सुमारास ह्यातील आकाश नामक आरोपीने पोलिसांच्या मारहाणीला त्रस्त होऊन स्वच्छता गृहात फिनाईल सदृश्य द्रावण प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी त्याला तात्काळ सावली येथील रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती जास्त खराब असल्याने त्याला चंद्रपूर येथिल जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
=======
पोलिसांवरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपींना अटक केली. लघुशंकेचा बहाणा करून त्याने स्वच्छतागृहातील हारपिक प्राशन केले. त्याला लागलीच रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्याकडून पैसे मागण्याचा प्रश्‍नच येत नाही. त्याला मारहाण केली नसून, केवळ विचारपूस केली जात होती. पैसे मागितल्याचा आरोप निरर्थक आहे.
: – रोशन शिरसाठ, सावली पोलीस ठाणेदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here