त्या फसव्या जाहिरात विरोधात पोलिसांत भाजपा ची तक्रार

0
182

त्या फसव्या जाहिरात विरोधात पोलिसांत भाजपा ची तक्रार

अज्ञातव्यक्ती विरुद्ध सायबर कायद्यातंर्गत गुन्हा दाखल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा गैरवापर करून सोशल मीडिया वर व्हायरल झालेल्या एका फसव्या जाहिरात विरोधात चंद्रपुर महानगर भारतीय जनता पार्टी महामंत्री,नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार यांनी एक तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी या विषयाची गंभीर दखल घेत,ती पोस्ट व्हाट्स एपवर व्हायरल करणाऱ्या अज्ञातव्यक्ती विरोधात सायबर सायबर कायद्यातंर्गत गुन्हा नोंदविला आहे.
प्राप्त माहिती नुसार भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या व्हाट्स एप वर बुधवार(26 मे)ला एक टेक्स्ट मॅसेज आला.यात एका वेबसाईटची माहिती देण्यात येऊन प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021 मध्ये निशुल्क नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ही बाब भोंगळे यांनी महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार यांना सांगितली व  याची चौकशी करून सत्य जाणून घेण्याचा सूचना केल्या.कासंगोट्टूवार यांनी त्या वेबसाईटवर जाऊन बघितलं असता,तेथे पंतप्रधान नावाचा व फोटोचा वापर करीत,प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021 जाहीर करण्यात आली आहे.नोंदणी केल्यास,यात 2021 मध्ये 10 कोटी परिवाराला याचा लाभ मिळणार असून 50 कोटी पेक्षा अधिक लोकांना याचा लाभ मिळेल असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.केंद्र सरकार द्वारे संचालित ही योजना असून 18 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना 2500 ते 3000 रु प्रतिमाह बेरोजगार भत्ता दिला जाईल असे आश्वासन यात देण्यात आले आहे.ऑनलाइन नोंदणीचा एक फॉर्म ही येथे देण्यात आला आहे.जिल्हाध्यक्ष भोंगळे व नगरसेवक कासंगोट्टूवार यांनी या संदर्भात पक्षश्रेष्ठींकडे विचारणा केली असता,अशी कोणतीही योजना    मोदींनी लागू केली नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने कासंगोट्टूवार यांनी येथील रामनगर पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन तक्रार दाखल केली.पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेणे सुरू केले,असून त्या विरुद्ध भारतीय दंड संहिता1860-कलम 468,माहिती  तंत्रज्ञान अधिनियम 2008 च्या कलम 66 सि व डी गुन्हा नोंदविला आहे.अश्या फसव्या जाहिरात ला बळी पडू नये,असे आवाहन जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,महानगर महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here