जागतिक पर्यावरण दिनानिमीत्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने वृक्षारोपण

0
73

जागतिक पर्यावरण दिनानिमीत्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन
 शहरातील विविध भागात वृक्ष लागवड व संगोपणाचा संकल्प

        जागतिक पर्यावरण दिनानिमीत्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील विविध भागात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येने वृक्षलागवड करत लावलेल्या वृक्षांचे संगोपण करण्याचा संकल्प घेतला. या उपक्रमात यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे,  कलाकार मल्लारप, अमोल शेंडे,  विश्वजीत शाहा, हरमन जोसेफ, राम जंगम, दत्तू भोयर, दिनेश इंगडे, नितीन शाहा, अजय दुर्गे, देवा कुंटा, मुन्ना जोगी, राजेश वर्मा, सोहिब शेख, आनंद रणशूर, गौरव जोरगेवार, राशीद हुसेन, प्रतीक शिवणकर, सलीम शेख, राहुल मोहुर्ले यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
आमदार किशोर जोरगेवार संस्थापक अध्यक्ष असलेल्या यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजीत केल्या जात आहे. आज जागतिक पर्यावरण दिनानिमीत्यही संस्थेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रीत न येता आपआपल्या वार्डात हा उपक्रम राबवीला. यात इंदिरा नगर विभाग, बाबूपेठ विभाग, लालपेठ जंगमबस्ती विभाग, तुकूम विभाग, पडोली विभाग, भिवापूर विभाग, बंगाली कॅम्प विभाग, यासह संस्थेच्या इतर विभागांनी सहभाग घेत आपआपल्या प्रभागात वृक्षारोपण केले. यावेळी लावलेल्या वृक्षांचे मी संगोपण करणार असा संकल्पही घेण्यात आला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here