“रोजगार संघ” आयोजित “वृक्षसखा” राज्यस्तरीय वृक्ष लागवड स्पर्धेचे उद्घाटन

206

 

धामणगाव रेल्वे

मोक्षधाम (स्मृती उद्यान) तिवरा येथे रोजगार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वृक्षसखा’ पुरस्कार तथा राज्य स्तरीय वृक्ष लागवड स्पर्धेचे उद्घाटन तीवरा ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष किशोर मधुकरराव निसार यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता करण्यात आले.         सदर स्पर्धा रोजगार संघ नागपूर द्वारा आयोजित करण्यात आली असून या अंतर्गत संस्थात्मक आणि वैयक्तिक स्तरावर भरघोस रक्कमेचे पुरस्कार दिल्या जाणार आहेत. स्पर्धेचा कालावधी ५ जून ते डिसेंबर २१ असून १२ जानेवारी २२ रोजी विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ५ जूनला शनिवारी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तिवरा येथील स्मृती उद्यान परिसरात वृक्षारोपण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या वेळी गूगल झूम मीटिंग द्वारे रोजगार संघाचे अध्यक्ष संजय नाथे यांनी मार्गदर्शन केले. सोबतच रोजगार संघाचे कार्याध्यक्ष गजानन बोबडे व सरचिटणीस उद्धव साबळे यांनीदेखील मार्गदर्शन केले. वृक्ष लागवड कार्यक्रमाला तीवरा येथील किशोर निसार, योगेश अंभोरे, सुधीर परडखे, प्रफुल्ल वानखडे, सागर दाभेकर, सुखदेव उके, राहुल चौधरी, दत्ता कडूकार, राजू ताकसांडे पुणाजी अठोर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोजगार संघ तीवरा शाखेने विशेष परिश्रम घेतले. या ऑनलाइन कार्यक्रमात विविध गावातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते तथा रोजगार संघाचे हितचिंतक सहभागी झाले होते.