पैगाम तर्फे मास्क व जीवनावश्यक वस्तूंचेवाटप

0
172

*पैगाम तर्फे मास्क वाटप कार्यक्रम*
वरोरा येथील पैगाम साहित्य व सामाजिक मंडळी या बावन वर्षापासून सतत कार्यरत असलेल्या नामांकित संस्थेतर्फे वरोरा भद्रावती तालुक्यामध्ये मास्क वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला करुणा मुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे गोरगरीब जनतेच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला अशाने साहित्यक्षेत्रात सदा अग्रेसर असलेली पैगाम संस्था 500 किलो कणीक दीडशे किलो तूर डाळ 350 किलो तांदूळ 200 लिटर खाद्य तेलाची पाकीट तिखट मीठ मसाले असे किराणा साहित्य ची किट वाटप करण्यासाठी पुढे आली.
वरोरा भद्रावती तालुक्यातील पोलीस स्टेशन आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पोलिस चौक्या तसेच उपजिल्हा रुग्णालय वरोरा आणि त्यांच्या शी संलग्न प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत कर्मचारी वर्गांना 3000 मार्च चे वाटप पैगाम साहित्य व सामाजिक मंडळ यांचेकडून करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट मोरेश्वर टेंभोडे माजी उपाध्यक्ष विधानसभा आणि सचिव अशोक वर्मा सह अशोक धात्रक विशाल वर्मा अमित वर्मा डॉक्टर मनोज तेलंग यांनी हे मास्क संबंधित कार्यालयात भेट देऊन वितरित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here