■रोजगार संघाचा “उपक्रम” ■ एक सरपंच,एक विषय!

173

रोजगार संघाने दर रविवारला सरपंच,एक विषय! हा उपक्रम सुरू केले आहे

सरपंच,एक विषय! – प्रत्येक रविवारी विकासाचा एक मुद्दा घेऊन त्यावर साधक-बाधक चर्चा करीत मागच्या रविवारी येनिकोनी चे सरपंच मनिषभाऊ फुके यांनी वृक्ष लागवड, नियोजन व झाडांची उपलब्धता हा विषय घेऊन त्यांनी गावात राबविलेल्या वृक्ष लागवडी बाबत फार सुंदर माहिती दिली.गावाचे नंदनवन करण्यासाठी जे कष्ट काही सरपंच मंडळी घेत आहेत ते इतरांचे वाट्याला येऊ नये ,विकास पंढरीतील वारकर्यांना योग्य दिशा मिळावी या हेतूने हा उपक्रम आपण दर रविवारी आयोजित करीत असतो. येत्या रविवारी 20 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता “वृक्ष लागवड,संवर्धनातील लोकसहभाग ” या विषयावर ग्रामपंचायत खुर्सापार चे सरपंच प्रा.श्री सुधीरजी गोतमारे(पाटील)आपले अनुभव कथन करतील .”वृक्षसखा” पुरस्काराच्या धर्तीवर पुन्हा आपण वृक्ष लागवड विषयावर ‘बोलणार आहोत,तरी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण खाली दिलेल्या लिंकचा वापर करून ऑनलाइन चर्चासत्रामध्ये सहभागी व्हावे! कार्यक्रम शार्प 11 वाजता सुरू होऊन 12 वाजता बंद होईल ,याची दखल घ्यावी. ■यासंबंधी ऑनलाइन लिंक ग्रुपमध्ये एकतास आधी पाठविण्यात येईल. ■ अशी माहिती रोजगार संघाचे सरचिटणीस ,उद्धव साबळे यानी दिली