घाणीमुळे बरांज व चिचोर्डी वासियांचं आरोग्य धोक्यात

113

 

भद्रावती :-

भद्रावती क्षेत्रातील घाण बरांज कडे जाणाऱ्या मार्गांवर टाकली जात असल्यामुळे त्या मार्गाने जाणे कठीण झाले असून बरांज व चिचोर्डी येथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरा बाहेरुन बरांज व चिचोर्डी ला जाण्या करिता वापरत असलेल्या मार्गावर सध्या कमालीचे घाणीचे साम्राज्य साचले आहे या मार्गाचा वापर नागरिक मोठ्या प्रमाणात घाण फेकण्या करिता करत आहेत. नगरपालिका क्षेत्रात असलेले भाजी व्यवसाय करणारे आपला उर्वरित खराब झालेला भाजी पाला, सडलेली फड, मास मच्ची वीकल्या नंतर वाचलेले वेस्ट, गटार साफ केल्या नंतर निघालेली घाण, रुग्णालयातील वापरलेली इंजेकशन, कापूस निकामी औषध व इतर कचरा, मेलेली जनावर या सोबतच घरातून निघनारी सर्व प्रकारची घाण इथे फेकल्या जाते. नगरपालिका तर्फे कचरा व्यवस्थापणा करिता घंटा गाड्या, घण कचरा प्रकल्प, सफाई कामगार व स्वच्छताच्या इतर गोष्टीचा समावेश व्यापाऱ्यानसाठी करण्यात आला असला तरी स्वच्छते बाबत बेजबाबदार् पने वागत आहे अश्यान वर दंडात्मक कारवाही करण्यात यावी .