पोलीस पाटील यांना नियमित मानधन द्या.

0
173

पोलीस पाटील यांना मानधन देऊन नियमितपणे खात्यात जमा करावे.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली मागणी :-योगेश मते पोलीस पाटील
भद्रावती- सध्या ग्रामीण भागातील जनता जनार्धन आणि पोलीस प्रशासन यांच्यातील एकमेव दुवा म्हणजे पोलीस पाटील यांचे असते. प्रत्येक पोलीस पाटील याना त्वरित मानधन मिळावे, त्यांच्यावर प्रशासकीय कामकाज करतेवेळी मारहाण झाल्यास किंवा धमकी मिडाल्यास गुन्हेगारावर ३५३ अंतगर्त कठोर कारवाई करावी, पोलीस पाटील यांचे २०१२ पासून ते आज पर्यंत मासिकभत्ता देण्यात यावे अशी मागणी भद्रावती येथील नवनियुक्त पोलीस पाटील योगेश मते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. पोलीस पाटील हे नेहमी तंटा सोडविण्याची मुख्य भूमिका बजावतात, प्रशासनाला वेळोवेळी योग्य सहकार्य करून आपली जबाबदारी पार पाळतात आणि त्यांचेवरच कुठल्याही प्रकारचे कृत्य घडू नये यासाठी भद्रावती पोलीस पाटील यांनी एक पाऊल पुढे उचलून जिल्हा पोलीस अधीक्षकाना निवेदन केले आहे. निवेदन देताना भद्रावती येथील योगेश मते पोलीस पाटील, दीपक शेंबळकर शेगाव, सचिन झाडे माजरी, राजेंद्र पोईनकर, दिवाकर ढोले, राजेंद्र वांढरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here